ODI World Cup : अखेर पाकिस्तान संघाला विश्वचषकासाठी मिळाला व्हिसा, या दिवशी पोहोचणार भारतात

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ सप्टेंबर । भारतात क्रिकेट विश्वचषक सुरू होणार असून या स्पर्धेतील पहिला सामना 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दरम्यान, पाकिस्तान संघाला भारतात येण्यास मान्यता मिळाली असून भारत सरकारने पाकिस्तानी संघाला व्हिसा दिल्याची पुष्टी आयसीसीने केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सोमवारीच व्हिसा न मिळाल्याने आयसीसीकडे नाराजी व्यक्त केली असताना ही बातमी समोर आली आहे.

वास्तविक, पाकिस्तानला 29 सप्टेंबरला पहिला सराव सामना खेळायचा आहे, त्याआधी टीमला 27 सप्टेंबरला हैदराबादला पोहोचायचे आहे. मात्र कालपर्यंत पाकिस्तानी संघ आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफला व्हिसा मिळू शकला नव्हता. मात्र, सोमवारी सायंकाळी उशिरा व्हिसा मंजूर झाला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रवक्ते ओमर फारूक यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्डाने आयसीसीला पत्र लिहून वर्ल्ड कपसाठी व्हिसा मिळण्यात येणाऱ्या अडचणींबाबत चिंता व्यक्त केली होती.

पीसीबीने निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तानी संघाला या सर्व अडचणींमधून जावे लागत आहे, तेही सर्वात मोठ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जावे लागत आहे, हे अतिशय दुःखद आहे. पीसीबीने सांगितले की, सराव सामन्यापूर्वी आम्हाला आमची योजना पूर्णपणे बदलावी लागली, कारण खेळाडूंना अद्याप भारतात जाण्याची परवानगी मिळालेली नाही.

पाकिस्तान क्रिकेट संघाला आधी काही दिवस दुबईत राहावे लागले आणि नंतर भारताला रवाना व्हावे लागले. पण भारताकडून व्हिसा न मिळाल्याने पाकिस्तानला आपली टीम बाँडिंग योजना रद्द करावी लागली आणि पुन्हा संपूर्ण योजना करावी लागली. पाकिस्तानला आपले दोन सराव सामने आणि दोन सुरुवातीचे साखळी सामने हैदराबादमध्येच खेळायचे आहेत, त्यामुळे आता संघ थेट येथे येणार आहे.

विश्वचषक 2023 मध्ये पाकिस्तानचे वेळापत्रक:

29 सप्टेंबर विरुद्ध न्यूझीलंड (सराव सामना)
3 ऑक्टोबर वि. ऑस्ट्रेलिया (सराव सामना)
6 ऑक्टोबर विरुद्ध नेदरलँड
10 ऑक्टोबर विरुद्ध श्रीलंका
14 ऑक्टोबर विरुद्ध भारत
20 ऑक्टोबर विरुद्ध ऑस्ट्रेलिया
23 ऑक्टोबर विरुद्ध अफगाणिस्तान
27 ऑक्टोबर विरुद्ध दक्षिण आफ्रिका
31 ऑक्टोबर विरुद्ध बांगलादेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *