30 सप्टेंबरआधी उरकून घ्या ‘ही’ 4 कामं नाहीतर खातं फ्रिज होईल

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ सप्टेंबर । सप्टेंबर महिना संपण्यासाठी केवळ 4 दिवस बाकी आहेत. या 4 दिवसांमध्ये काही महत्त्वाची कामं तुम्ही केली नसतील तर ती वेळीच करुन घ्या नाहीतर तुमच्या अडचणी वाढू शकतात. आज आपण अशाच काही कामांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांची डेडलाइन ही 30 सप्टेंबर आहे.

चला तर मग जाणून घेऊयात अशा 4 कामांबद्दल जी तुम्ही 30 सप्टेंबर 2023 आधी केली नाहीत तर तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. लवकरात लवकर तुम्ही सुद्धा ही कामं पूर्ण करुन घेतली पाहिजेत. याच चार आवर्जून करायच्या कामांची यादी पाहूयात…

तुम्ही शेअर बाजार किंवा म्युच्यूअल फंडांमध्ये गुंतवणूक करत आणि तुमचं डीमॅट खातं असेल तर 30 सप्टेंबरअच्या आधी तुम्ही एक महत्त्वाचं काम उरकलं पाहिजे. हे काम म्हणजे या खात्यासाठी नॉमिनी म्हणजेच वारसदार नेमणे. तुम्ही जर वारसदार निवडला नाही तर खातं फ्रिज होऊ शकतं.

डीमॅट खातं फ्रिज झालं तर शेअर बाजारामध्ये ट्रेडिंग करता येणार नाही किंवा म्यूच्यूअल फंडामध्ये गुंतवणूकही करता येत नाही. सेबीने आपल्या डीमॅट खातेदारांना वारसदारांचं नाव नोंदवण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतचा कालावधी दिला आहे.

ऑक्टोबरपासून शेअर बाजारामध्ये ट्रेडिंग करण्याआधी वारस जाहीर केला नाही तर खातं गोठल्यास शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करता येणार नाही.

तुम्ही स्मॉल सेव्हिंग्स स्कीममध्ये गुंतवणूक केली असेल तर 30 सप्टेंबर तुमच्यासाठीही महत्त्वाची आहे. अर्थमंत्रालयाने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, स्मॉल सेव्हिंग्स स्कीममध्ये सबस्क्राइब करणाऱ्यांना 30 सप्टेंबरपर्यंत आधार कार्डची कॉपी जमा करण्याचे निर्देस दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *