….. हे काम कर गोलंदाजीचा वेग वाढेल, नीरज चोप्राचा बुमराला सल्ला

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि . ७ डिसेंबर ।। ‘तू तुझा रनअप वाढव, तुझ्या बॉलिंगचा वेग नक्कीच वाढेल, असा लाखमोलाचा सल्ला दिलाय हिंदुस्थानचा ‘गोल्डन भालाफेक’पटू नीरज चोप्राने हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला.

मी माझ्या भालाफेकीच्या अनुभवावरून जसप्रीत बुमराला हा सल्ला देतोय. बुमरा हा माझा आवडता गोलंदाज आहे. जगावेगळी त्याची गोलंदाजीची शैली बघायला खूप मजा येते, मात्र त्याचा रनअप थोडा छोटा आहे. जर बुमराने त्याचा रनअप थोडासा मागे केला तर त्याच्या गोलंदाजीचा वेग आणखी वाढू शकतो, असे नीरज चोप्राला प्रामाणिकपणे वाटते. म्हणूनच त्याने स्वतःहून बुमराला वेगाबाबात सल्ला दिला आहे.

टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजीवर बरेच काही अवलंबून आहे. जसप्रीत बुमरा हा तिन्ही फॉरमॅट खेळणारा वेगवान गोलंदाज आहे. तो ताशी 135 ते 145 किमी वेगाने गोलंदाजी करतो. बुमराने नुकत्याच झालेल्या वन डे वर्ल्ड कपमध्येही चमकदार कामगिरी केली होती. त्याने 11 सामन्यांत 18.65 च्या सरासरीने 20 विकेट टिपल्या होत्या. वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट टिपणारा तो चौथा गोलंदाज ठरलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *