पडळकरांच्या वक्तव्यावर बावनकुळेंनी व्यक्त केली दिलगिरी ; ….. हे भाजपच्या संस्कृतीत बसणारे नाही

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ सप्टेंबर । ‘राजकीय मतभेद असतील; पण मनभेद तयार करून व्यक्तिगत व मर्यादाबाह्य टीकाटिप्पणी करणे, अशोभनीय आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल केलेले विधान हे भाजपच्या संस्कृतीत बसणारे नाही, त्यामुळे पडळकर यांना भाजप पाठीशी घालणार नाही. त्यांच्यामुळे पवार यांचे मन दुखावले असेल तर मी त्यांची माफी मागतो,’ अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलगिरी व्यक्त केली. ‘पवार यांनी मन मोठे करून पडळकरांना माफ करावे,’ असेही ते म्हणाले. 

बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी पुण्यात शहर भाजप कार्यकारिणीची बैठक घेऊन नवनियुक्त पदाधिकार्‍यांना नियुक्तिपत्रे दिली गेली. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘पडळकर यांनी अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानाची दखल घेऊन आपली नाराजी व्यक्त केली. आपण पडळकर यांच्याशी चर्चा केली. विधानाबद्दल पवार यांची दिलगिरी व्यक्त करतो,’ असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *