SA vs NED : चोकर्स असेच नाही म्हणत ; विश्वचषकात नेदरलँड्सची बलाढ्य दक्षिण आफ्रिकेवर मात

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑक्टोबर | यंदाचा विश्वचषकात (World Cup 2023 ) दुबळे समजले जाणारे संघ कमाल करताना दिसतं आहे. दुबळ्या नेदरलँड्सने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा सुपडा साफ केला आहे. हा वर्ल्डकपमधील दुसऱ्या उलटफेर आहे. गतविजेता इग्लंडला अफगाणिस्तानने हरवलं त्यानंतर नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये सलग 2 सामने जिंकणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची नेदरलँड्सच्या खेळासमोर फज्जा उडाला. (Another shock result at the World Cup 2023 Netherlands beat mighty South Africa)

246 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाला घाम फुटला. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला 207 धावांवर गुंडाळलं. नेदरलँड्स गोलंदाजांसमोर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना मैदानाबाहेरचा रस्ता गाठावा लागला. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू क्विंटन डी कॉक शतकी हॅटट्रिक करण्यासाठी मैदानात उतरला होता. मात्र नेदरलँड्सच्या कॉलिन अकरमन याने त्याचं स्वप्न धुळीस मिळवलं. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला 42.5 ओव्हर्समध्ये 207 धावांवर ऑलआऊट करुन वर्ल्डकपमधील दुसऱ्या मोठा उलटफेर केला आहे. डेव्हिड मिलर वगळता संघाचा एकही फलंदाज क्रीजवर थांबून नेदरलँडच्या गोलंदाजांचा सामना करण्यात अपयशी ठरला.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *