Why You Always Feel Tired : हे असू शकतात गंभीर आजाराचे संकेत ; वेळीच घ्या काळजी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑक्टोबर । ऑफिसमध्ये तासनतास काम केल्यानंतर आपण अधिक प्रमाणात थकतो. घरी येऊन बेडवर पडल्यानंतर सरळ झोपून जातो. आपण इतके थकलेले असतो की, आपल्याला पुन्हा उठण्याची ताकद नसते.

सध्याचा काळ हा अंत्यत धकाधकीचा झाला असून रोजच्या जीवनशैलीत सकस आहार घेणे प्रत्येकाला शक्य नाही. त्यामुळे आरोग्याची काळजी घेता येत नाही. काम करताना आपल्याला सतत थकवा आणि आळस जाणवतो. परंतु याकडे दुर्लक्ष केल्यास हृदयरोगाचा धोका वाढण्याची शक्यता असते. 

शरीराला निरोगी आणि फिट ठेवण्यासाठी आपल्याला अनेक व्हिटॅमिन गरज असते . व्हिटॅमिन हा आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक घटक आहे . व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे आपल्याला अनेक आरोग्याच्या समस्या भेडसावतात.

दिवसभर ऑफिसमध्ये (Office) असल्यामुळे आपण उन्हाच्या संपर्कात कमी येतो. तसेच पुरेसा सकस आहार न खाल्ल्यामुळे आपल्याला व्हिटॅमिनची (Vitamins) कमतरता जाणवू लागते. सध्या युवकांमध्ये व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी १२ ची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवत आहे. यामुळे अंगदुखी, आळस, थकवा अशा तक्रारी असलेल्या रूग्णाचं प्रमाण २५ टक्के असल्याचं निदर्शनास आले आहे. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे सातत्याने जाणवणारा थकवा हृदयरोगाला निमंत्रण देऊ शकतो, असं स्वित्झर्लंडमधील एका संशोधन संस्थेनं म्हटले आहे .

1. व्हिटॅमिन डीची आवश्यकता

1. मानवी शरीरातील अनेक अवयव आणि पेशींना त्यांचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डीची गरज असते

2. शरीराली मिळणाऱ्या व्हिटॅमिन डीमध्ये सीरमचे प्रमाण कमी असल्यामुळे हृदयरोग आणि पॅरालिसिस होण्याची शक्यता असते.

2. लक्षणे आणि व्हिटॅमिन मिळण्याचे स्त्रोत

व्हिटॅमिन बी १२ –

लक्षणे (Symptoms) – डोळ्यांचा त्रास ,स्मृतीभ्रंश होणे, श्वास घेण्यास त्रास , हात -पाय दुखणे, थकवा जाणवणे .

स्त्रोत – दुध आणि दुधजन्य पदार्थाचा आहारात समावेश करणे

व्हिटॅमिन डी –

लक्षणं – वारंवार आजारी पडंण , सांधे दुखी ,थकवा आणि चिडचिडपणा होणे

स्त्रोत – सकाळचं कोवळं ऊन आणि दुधजन्य पदार्थ

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *