Team India: BCCIने वर्ल्ड कपच्या मध्यावर टीम इंडियाबाबत घेतला मोठा निर्णय, ‘या’ गोष्टींवर घातली बंदी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ ऑक्टोबर | ICC World Cup 2023: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत सलग ५ विजयांची नोंद करणाऱ्या भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी खूप दिवसांची विश्रांती मिळाली आहे. २९ ऑक्टोबर रोजी लखनऊ येथे होणाऱ्या सामन्यापूर्वी खेळाडूंना पूर्ण २ दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. मात्र, याच दरम्यान बीसीसीआयने भारतीय संघावर काही गोष्टी करण्याबाबत बंदी घातली आहे. ही बंदी सर्व खेळाडूंना बंधनकारक असणार आहे.

भारतीय संघ व्यवस्थापनाने सर्व खेळाडूंना डोंगरावर ट्रेकिंग करण्यास बंदी घातली आहे. धरमशाला येथे न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर संघ सध्या येथेच थांबला आहे. दरम्यान, भारतीय खेळाडू शहरातील इतर ठिकाणांना भेट देऊ शकतात, परंतु ट्रेकिंगला पूर्णपणे मनाई आहे. हे नियम वरिष्ठ खेळाडूंना देखील लागू आहेत.

भारताच्या दोन सामन्यांमध्ये सात दिवसांचे अंतर आहे. त्यामुळे खेळाडूंना दऱ्या-खोऱ्यात फिरण्यासाठी २ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “संघ व्यवस्थापनाने खेळाडूंना कळवले आहे की ते ट्रेकिंगला जाऊ शकत नाहीत, ते बाहेर कुठेही फिरायला जाऊ शकतात, पण ट्रेकिंग करू शकत नाहीत. त्याचबरोबर या मालिकेदरम्यान कोणताही भारतीय खेळाडू पॅरा ग्लायडिंग करू शकत नाही. कारण, हे खेळाडूंच्या कराराच्या विरोधात आहे. यात बीसीसीआय विश्वचषकाच्या तोंडावर कुठलाही धोका पत्करू शकत नाही.”

हिमाचल प्रदेशातील या दऱ्या ट्रेकिंगसाठी खूप प्रसिद्ध आहेत आणि खूप आकर्षक ठिकाणेही आहेत. अशा स्थितीत भारतीय खेळाडूही ट्रेकिंगसाठी उत्सुक होते. मात्र, विश्वचषकामुळे भारतीय संघ कोणत्याही खेळाडूला दुखापत होण्याचा धोका पत्करू शकत नाही. अशा स्थितीत ट्रेकिंगवरील ही बंदी सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही पाहिली जात आहे.”

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *