विमानाच्या मागे दिसणारी पांढरी रेषा म्हणजे धूर नव्हे

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० ऑक्टोबर ।। वॉशिंग्टन : अनेकदा आकाशात उडणार्‍या विमानकडे पाहिल्यानंतर विमानाच्या मागे एक पांढरी रेषा दिसते. आपल्याला वाटते की, हा धूर असावा. वास्तवात हा मोठा गैरसमज आहे. कारण, या मागचे गूढ अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने याबद्दल शास्त्रीय माहितीद्वारे उकलले आहे.

नासाच्या रिपोर्टनुसार, विमानाच्या मागे दिसणारी पांढर्‍या रंगाच्या रेषांना कंट्रेल्स म्हणतात. कंट्रेल्स म्हणजे एक प्रकारचे ढग असतात. तथापि, हे कंट्रेल्स सामान्य ढगांपेक्षा वेगळे असतात. हे ढग फक्त विमान किंवा रॉकेटमुळेच तयार होतात. नासाच्या अहवालानुसार, जेव्हा विमान पृथ्वीपासून 8 किलोमीटर अंतरावर आणि उणे 40 अंश सेल्सिअस तापमानात उडत असते, तेव्हाच हे ढग तयार होतात. रॉकेट किंवा विमानांच्या एग्जॉस्टमधून एरोसॉल्स बाहेर पडतात.

एरोसॉल्स म्हणजे हवेतील द्रव बिंदू आणि इतर वायूचे सूक्ष्म कण. हवामानातील आर्द्रतेमुळे या एरोसॉल्सचे रूपांतर ढगात होते आणि यालाच कंट्रेल्स असे संबोधले जाते.

कंट्रोल्स लगेच गायब का होतात?

विमान किंवा रॉकेटने काही अंतर पार केल्यानंतर हे कंट्रेल्स गायब होतात. आपल्यालाही प्रश्न पडतो की, हे कंट्रोल्स लगेच गायब कसे झाले? यामागील कारण म्हणजे हवेमधील आर्द्रतेमुळे हे कंट्रेल्स तयार होतात. आकाशातील जोरदार वार्‍यामुळे कंट्रेल्सही त्यांच्या जागेवरून सरकतात आणि गायब होतात. सर्वात पहिल्यांदा कंट्रेल्स 1920 साली दुसर्‍या महयुद्धाच्या वेळी दिसले होते. या कंट्रेल्समुळे फायटर पायलट म्हणजे लढाऊ वैमानिकांची सुटका व्हायची. यातील धक्कादायक बाब म्हणजे या कंट्रेल्समुळे अनेक विमाने एकमेकांवर आदळल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *