जगातील दुर्मीळ निळा ज्वालामुखी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ डिसेंबर ।। ज्वालामुखी म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो लाल आणि नारंगी रंगाचा लाव्हा. जो डोंगरांमधून उफाळत असतो. त्यामधून धूरही निघत असतो. आपल्या सर्वांना लहानपणापासून ज्वालामुखीची अशी प्रतिमा तयार झाली आहे. पण असे सांगितले की निळ्या रंगाचाही ज्वालामुखी असतो तर? कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही; पण हे खरे आहे.

निळ्याशार रंगाचा हा ज्वालामुखी डोळ्यांनी पाहताना फारच सुखावते; पण तो तितकाच धोकादायक देखील आहे. अलीकडेच आयर्लंडमधील एक ज्वालामुखी प्रकाशझोतात आला, जेव्हा त्यात एक स्फोट दिसला. यावरून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत; पण या सर्वात इंडोनेशियातील एका ज्वालामुखीचे फोटो समोर आले आणि त्यावरून त्याच्या निळ्या रंगामुळे चर्चा सुरू झाली.

इंडोनेशियातील या ज्वालामुखीचे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. ज्यामधून चमकदार निळा लाव्हा बाहेर पडत राहतो. या ज्वालामुखीच्या आतून बाहेर पडणारा लाव्हा हा सामान्य ज्वालामुखीपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. हा इतर लाल किंवा नारंगी लाव्हासारखाच धोकादायक आहे. हा लाव्हा क्षणात काहीही वितळवू शकतो. हा बहुधा अत्यंत दुर्मीळ ज्वालामुखी आहे, ज्यातून निळा लाव्हा बाहेर पडतो. या ज्वालामुखीच्या विवरात सल्फ्यूरिक वायू असल्याचे सांगितले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *