Instagram युजर्सना मिळणार एक खास फिचर; फॉलोअर्स वाढवण्यासाठी होणार मदत…

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ डिसेंबर ।। आजकाल प्रत्येक जण सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्यातील इन्स्टाग्राम ॲप तरुणांची पहिली पसंती आहे. तरुणांमध्ये रील्स आणि स्टोरीजची वेगळीच क्रेझ आहे. तसेच या ॲपची मदत घेऊन अनेक छोटे व्यवसाय आणि तर इन्फ्लुएन्सरदेखील त्यांचे कन्टेन्ट पोस्ट करत असतात, तर आता इन्स्टाग्राम या सगळ्यांसाठी लवकरच एक खास फिचर घेऊन येणार आहे.

लोकप्रिय मेटा-मालकीचे ऑडिओ आणि व्हिडीओ शेअरिंग इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्म एका नवीन फिचरवर काम करत आहे, जे वापरकर्त्यांना इतर लोकांची प्रोफाइल स्टोरी म्हणून पोस्ट करण्यास परवानगी देईल. इन्स्टाग्राम युजर्स स्टोरी म्हणून इतरांच्या प्रोफाइलवरील पहिल्या तीन पोस्ट आणि प्रोफाइल नाव आणि बायोसारखी माहिती पोस्ट करू शकतील. तसेच इतर वापरकर्त्यांना ‘स्टोरी’ म्हणून शेअर केलेलं प्रोफाइल पाहण्यास परवानगी देईल.

इन्स्टाग्राम ॲप युजर्सना स्टोरीवर प्रोफाइल शेअर करण्याचा पर्याय देणार आहे. म्हणजेच इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तुम्ही तुमचे किंवा इतर कोणाचेही प्रोफाईल शेअर करू शकणार आहात. सध्या ॲपमध्ये स्टोरी शेअरचा पर्याय आहे. पण, तो क्यूआर कोडच्या स्वरूपात येतो; ज्यामुळे युजर्सना त्रास होतो. तर नवीन फिचर आल्यानंतर तुम्ही तुमचे प्रोफाइल शेअर करू शकाल आणि इतर युजर्स थेट तुमच्या प्रोफाइलवर टॅप करून तुमच्यापर्यंत पोहचू शकणार आहेत. तसेच याचा फायदा कन्टेन्ट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर यांना त्यांचे फॉलोअर्स वाढवण्यासदेखील मदत करेल.

नवीन फिचरमुळे इन्स्टाग्राम वापरकर्त्यांना त्यांच्या आवडत्या क्रिएटरचा प्रोफाइल स्टोरीवर पोस्ट करता येईल. तसेच यामुळे हे क्रिएटर कोणत्या प्रकारची कन्टेन्ट तयार करतात, हे देखील इतर प्रेक्षकांना कळू शकेल. कन्टेन्ट क्रिएटर, इन्फ्लुएन्सरचे स्टोरीवर प्रोफाइल शेअर केल्यावर तुम्हाला व्यूव्ह प्रोफाइल (view profile) पर्याय दिसेल. यावर क्लिक करून इतर युजर्स हे प्रोफाइल सहज पाहू शकतात. हा फिचर नव्याने व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास ठरेल. म्हणजेच मेहेंदी आर्टिस्ट, दागिने किंवा विविध टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणाऱ्या अनेक तरुण मंडळींसाठीही त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी खूप उपयोगी ठरेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांची कला पोहचेल.हे फीचर युजर्ससाठी कधी उपल्बध होणार याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *