आता तुम्ही भेट दिलेल्या वेबसाइट्सची होणार ‘या’ ॲप्समध्ये नोंद! काय आहे Meta चे नवीन फीचर?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ जानेवारी ।। मेटाच्या मालकीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील फेसबुक हे सर्वाधिक वापरले जाणारे ॲप आहे. फेसबुकमध्ये अनेक फीचर्स असे आहेत; जसे की फोटो पोस्ट करणे, मीम्स शेअर करणे, फोटो किंवा व्हिडीओ स्टोरीवर लावणे, एखाद्याचा वाढदिवस असेल तर त्याची आठवण करून देणे आणि त्याबरोबरच वैयक्तिकरीत्या संवाद साधण्यासाठी इथे मेसेंजर ॲपसुद्धा आहे. तर या सर्व गोष्टींमुळे अनेक वापरकर्ते या ॲपचा आजही तितकाच उपयोग करतात. आता कंपनी वापरकर्त्यांसाठी एक नवीन फीचर घेऊन आली आहे. या फीचरचे नाव ‘लिंक हिस्ट्री’, असे आहे.

मेटाने हे फीचर फेसबुक प्लॅटफॉर्मसाठी ॲण्ड्रॉइड आणि आयसोएस मोबाईल ॲपसाठी लॉंच केले आहे. हे फीचर ३० दिवसांत तुमच्या फेसबुक अकाउंटद्वारे तुम्ही भेट दिलेल्या वेबसाइटची नोंद ठेवतो. तुम्ही हे नवीन फीचर ऑन केल्यानंतर तुम्ही कोणतीही वेबसाइट उघडा किंवा सर्च करणार किंवा एखाद्याचे अकाउंट चेक कराल तर याची संपूर्ण हिस्ट्री फेसबुकमध्ये सेव्ह होईल. फेसबुकचे हे नवीन लिंक हिस्ट्री फीचर गेल्या ३० दिवसांत तुम्ही सर्च केलेल्या सर्व वेबसाइटविषयीची माहिती देईल.

तसेच वापरकर्ते ३० दिवसांत त्यांनी कोणती वेबसाइट उघडली किंवा कोणत्या वेबसाइटला भेट दिली हे पाहण्यासाठी त्यांना स्वतःच्या प्रोफाइलवर क्लिक करून सेटिंग्स आणि प्रायव्हसीवर जाऊन लिंक हिस्ट्री या पर्यायावर क्लिक करावे लागेल. असे केल्याने तुम्ही फेसबुकच्या सर्च केलेल्या लिंक हिस्ट्रीची यादी पाहू शकणार आहात. तुम्हाला हा पर्याय सोईस्कर किंवा सुरक्षित वाटत नसेल, तर तुम्ही हे फीचर चालू ठेवू शकता किंवा बंदही करू शकता.

फेसबुकवर ‘लिंक हिस्ट्री’ हे फीचर कसे बंद करावे?

१. फेसबुक ॲप उघडा आणि कोणत्याही लिंकवर टॅप करा.

२. उजव्या कोपऱ्यात असणाऱ्या ‘More’ ऑप्शनवर टॅप करून नंतर ‘सेटिंग्ज’वर टॅप करा.

३. थोडे स्क्रोल करा. त्यात तुम्हाला लिंक हिस्ट्री हा पर्याय दिसेल.

४. तिथे खाली तुम्हाला Allow लिंक हिस्ट्री हा पर्याय दिसेल.

५. जर तुम्हाला लिंक हिस्ट्री चालू ठेवण्याची असेल, तर तेथील ऑप्शन ऑन आणि बंद करायची असल्यास ऑफ करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *