Maharashtra Budget 2024 : अजित पवारांच्या बजेटमध्ये शिक्षणासाठी या ८ घोषणा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ फेब्रुवारी ।। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०२४ चा राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी उच्च तसेच शालेय शिक्षणासाठी तरतुदी जाहीर केल्या. सन २०२४-२५ च्या अर्थ संकल्पामध्ये एकूण खर्चासाठी ०६ लाख ५२२ कोटीची तरतूद करण्यात आली. तर शिक्षणासाठी या खालील तरतुदी जाहीर केल्या आहेत..

शैक्षणिक तरतूद २०२४-२५
१) वाशिम,जालना,हिंगोली,अमरावती, भंडारा, गडचिरोली, बुलढाणा, पालघर, नाशिक तसेच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे प्रत्येकी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, संलग्नित ४३० खाटांचे रुग्णालय
२) जळगाव, लातूर, बारामती, नंदूरबार, गोंदिया, कोल्हापूर आणि मिरज जिल्हा सांगली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न प्रत्येकी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या (नर्सिंग) महाविद्यालय
३)नागपूर येथील एम्सच्या धर्तीवर पुण्यातील औंध येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था सुरु करण्याचा विचार
४) मातंग समाजासाठी बार्टीच्या धर्तीवर अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था आर्टीची स्थापना होणार
५) मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळांमार्फत मुदत कर्ज, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज व सूक्ष्म पतपुरवठा योजनेकरिता शासनाची हमी
३० कोटी वरून ५०० कोटी रुपये
६) वरळी मुंबई येथे आधुनिक प्रशिक्षण व कौशल्य विकास भवन
७) कार्यक्रम खर्चाकरिता उच्च व तंत्र शिक्षण भिजला २ हजार ९८ कोटी रुपये तर शालेय शिक्षण विभागाला २हजार ९५९ कोटी रुपयांची तरतूद
८) राज्यात नवीन २ हजार प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *