Tata Electronics : ‘टाटा इलेक्ट्रॉनिक्स’मुळे ७२ हजार नोकऱ्यांची संधी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ मार्च ।। टाटा इलेक्ट्रॉनिक्स चिप उत्पादक प्रकल्प वाहन, ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, वैद्यकीय यांसह विविध उद्योगांना टप्प्याटप्प्याने आवश्यक सेमीकंडक्टर चिपचा पुरवठा करून सर्व क्षेत्रांची गरज पूर्ण करतील आणि सुमारे ७२ हजार नोकऱ्या निर्माण करतील, असे टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी आज येथे सांगितले.

आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या ९१ हजार कोटी रुपये खर्चाच्या चिप उत्पादन प्रकल्पाचे आणि २७ हजार कोटी रुपयांच्या चिप असेंब्ली सुविधेच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. ‘‘या प्रकल्पांची ही सुरुवात आहे, हळूहळू याचा विस्तार होईल. येथे ५० हजार नोकऱ्या आणि आसाममध्ये किमान २० ते २२ हजार नोकऱ्या उपलब्ध होतील,’’ असेही चंद्रशेखरन यांनी सांगितले.

या प्रकल्पात २८ नॅनोमीटर ते ११० नॅनोमीटरच्या चिप तयार करण्याची क्षमता आहे, असेही त्यांनी सांगितले. ‘‘कॅलेंडर वर्ष २०२६च्या उत्तरार्धात चिपचे उत्पादन करणे आमचे उद्दिष्ट आहे. आसाममध्ये २०२५ च्या उत्तरार्धात किंवा २०२६ च्या सुरुवातीस उत्पादन सुरू करू शकतो.’’असेही चंद्रशेखरन यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *