3 Idiots : ‘त्या’ सीनसाठी आम्ही केलं होतं मद्यपान! 15 वर्षांनंतर अभिनेत्यानंचृ केला खुलासा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ मार्च ।। बॉलिवूड अभिनेता आर माधवन हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. आर माधवन हा गेल्या काही दिवसांपासून शैतान या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील त्याची भूमिका ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तर सध्या आर माधनवनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राजकुमार हिरानी यांच्या ‘3 इडियट्स’ विषयी चर्चा केली. त्या चित्रपटातील एक सीन आहे. ज्यात आमिर खान, आर माधवन आणि शरमन जोशी हे तिघे मद्यपान करताना दिसत आहे. त्याविषयी आर माधनवनं या संपूर्ण सीनविषयी सांगितलं.

आर माधवननं ही मुलाखत ‘बीयरबाइसेप्स पॉडकास्ट’ ला दिली. या मुलाखतीत आर माधवननं त्या सीनवरून सुरु असणाऱ्या अफवाहांची पुष्टी करताना दिसत आहे. माधवननं खुलासा केला की तो स्वत: आमिर खान आणि शरमन जोशी खरंच तिन्ही कलाकार त्या शूट दरम्यान, नशेत होते. नशेच्या सीनला दाखवण्यावर आर माधवन म्हणाला, ही आमिरची युक्ती होती की नशेच्या सीन्समध्ये तुम्ही कधीही असं वागायला नको जसं नशेत असलेली व्यक्ती करते.

आर माधवननं पुढे सांगितलं की “आमिरनं म्हटलं की तुम्ही मद्यपान करायला हवं आणि असं वागायला हवं जसं तुम्ही नॉर्मल आहात. त्यानं रात्री 9 वाजता सुरु होणाऱ्या शूटिंगसाठी रात्री 8 वाजे पासून मद्यपान करण्यास सुरुवात करण्याची प्लॅनिंग केली. खरंतर, वातावरण बदल झाल्यामुळे शूटिंगला थोडा उशिर झाला, ज्यानंतर बेंगलुरुमध्ये असलेल्या थंड्या वातावरणात मद्यपान करण्याची मज्जा काही औरच झाली. आम्ही विचार केला की आम्ही नॉर्मल राहु, याशिवाय आम्हाला हे देखील लक्षात येत नव्हतं की आम्ही आमचे डायलॉग्स देण्यात आम्हाला तासन् तास लागत होते.”

त्याशिवाय आर माधवननं 8 वीत असताना नापास झाल्यानंतर त्याच्या वडिलांची कशी प्रतिक्रिया होती आणि त्यांच्यात काय बोलणं झालं होतं हे आठवत ‘3 इडियट्स’ मधील एक सीन आठवला. त्यानं सांगितलं की “त्याचे वडील त्याला अभिनय क्षेत्रात जाऊ देण्याच्या विरोधात होते. पण जेव्हा इंजीनियरिंग कॉलेजनं जेव्हा माझं अॅडमिशन कॅन्सल केलं तेव्हा सगळं काही ट्रॅकवर आलं.” त्यानं सांगितलं की “त्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्यांनी विचारलं की मी तुझं काय वाईट केलं आहे?” माधवन म्हणाला “मी फक्त तुम्हाला इतकं सांगू शकतो की मी तुम्हाला निराश करणार नाही.”

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *