पुण्यात ५१३ जागांसाठी पोलीस भरती सुरू ; जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ मार्च ।। Pune Police Recruitment 2024 : अनेक तरुण मंडळी पोलीस भरतीची आतुरतेने वाट पाहत असतात. सध्या पोलीस भरती २०२४ ऑनलाईन अर्जाची लिंक ५ मार्चपासून सुरू झाली आहे. लिंक वरून तुम्ही तुम्हाला हव्या त्या जिल्ह्याच्या भरती प्रक्रियेविषयी जाणून घेऊ शकता आणि अर्ज करू शकता. याच पार्श्वभूमीवर पुणे कारागृह पोलीस विभाग अंतर्गत कारागृह शिपाई पदांच्या अर्ज मागविण्यात आले आहे. तब्बल ५१३ रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. आज आपण ही भरती प्रक्रिया कशी होणार, याविषयी जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव – पुणे कारागृह पोलीस विभाग अंतर्गत कारागृह शिपाई या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहे.

पदसंख्या – एकूण ५१३ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे.

शैक्षणिक पात्रता – कारागृह शिपाई पदासाठी बारावी पास ही शैक्षणिक पात्रता आहे.

नोकरीचे ठिकाण – ही भरती प्रक्रिया पुणे कारागृह पोलीस विभाग अंतर्गत राबवली जात आहे.

वयोमर्यादा – या भरती प्रक्रियेसाठी वयोमर्यादा खुला वर्गातील उमेदवारासाठी १८ ते २९ वर्षे आणि मागावर्गीय उमेदवारांसाठी १८ ते ३३ वर्षे आहे.

अर्ज शुल्क – खुला प्रवर्गासाठी अर्ज शुल्क ४५० रुपये/- आणि मागास प्रवर्गासाठी ३५० रुपये/- अर्ज शुल्क आहे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

शेवटची तारीख – भरती प्रक्रियेसाठी शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ आहे. त्यापूर्वी अर्ज करावा.

अधिकृत वेबसाईट – mahaprisons.gov.in या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करून याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्यावी.

अधिसुचना – https://admin.punepolice.gov.in/files/Recruitment/109.pdf ही अधिसुचना नीट भरावी.

निवड प्रक्रिया – खालील क्रमानुसार निवड प्रक्रिया करण्यात येईल.

शारीरिक चाचणी
लेखी परिक्षा
चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी
वैद्यकीय चाचणी
अर्ज कसा करावा?
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
अर्ज भरण्यापूर्वी अधिसुचना नीट वाचावी.
अर्जामध्ये नीट माहिती भरावी. अपूर्ण माहिती असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
आवश्यक कागदपत्रांची प्रत अर्जाबरोबर जोडावी.
शेवटच्या तारीखपूर्वी अर्ज भरावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *