Instagram Down : पुन्हा एकदा इन्स्टाग्राम झालं डाऊन? यूजर्स आपोआप होतायत लॉगआऊट

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ मार्च ।। Instagram Down in US : मेटाचा इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्म पुन्हा एकदा डाऊन झाल्याच्या तक्रारी यूजर्स करत आहेत. डाऊनडिटेक्टर वेबसाईटवर 5,000 हून अधिक यूजर्सनी याबाबत माहिती दिली आहे. अमेरिकेतील कित्येक यूजर्सचं अकाउंट आपोआप लॉगआउट होत असल्याचं म्हटलं आहे. सोबतच ऑस्ट्रेलिया आणि इतर काही देशांमध्ये देखील अशाच तक्रारी समोर येत आहेत.

डाऊनडिटेक्टर (Downdetector) ही वेबसाईट अशा प्रकारचे आउटेज रेकॉर्ड करते. इन्स्टाग्रामच्या तक्रारींमध्ये 70 टक्के लॉगइन इश्यू होते, 19 टक्के यूजर्सना अ‍ॅप ओपन करण्यासाठी अडचण येत होती, तर 11 टक्के यूजर्सनी सर्व्हर कनेक्शनबाबत तक्रार नोंदवली आहे.

दोन आठवड्यांतील तिसरी वेळ
काही दिवसांपूर्वी देखील मेटाचे फेसबुक अन् इन्स्टाग्राम हे दोन्ही प्लॅटफॉर्म जगभरात डाऊन झाले होते. 6 मार्च रोजी केवळ हे दोन प्लॅटफॉर्मच नाही, तर अमेरिकेतील कित्येक वेबसाईट्स डाऊन झाल्या होत्या. यामध्ये गुगल, अमेझॉन अशा मोठ्या कंपन्यांचाही समावेश होता. अर्थात, काही तासांमध्येच या सर्व वेबसाईट्स पूर्ववत झाल्या. मेटाच्या दोन्ही वेबसाईट्सना दोन दिवसांपूर्वीच प्रॉब्लेम आला होता. आता आज पुन्हा एकदा इन्स्टाग्रामबाबत तक्रारी समोर येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *