Railway News: रेल्वे प्रशासनाचा महत्वाचा निर्णय; आता शिक्षकांसाठी धावणार विशेष ट्रेन

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ मार्च ।। मध्य रेल्वेने उन्हाळ्याच्या गर्दीत दादर ते गोरखपूरदरम्यान शिक्षकांसाठी दोन पूर्णपणे आरक्षित विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुटीत गावी जाणाऱ्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ट्रेन क्रमांक ०११०१ शिक्षक विशेष दादर येथून २ मे २०२४ रोजी दुपारी १४.०५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी मध्यरात्री २.४५ वाजता गोरखपूर येथे पोहोचेल.

ट्रेन क्रमांक ०११०२ शिक्षक विशेष गोरखपूर येथून १० जून २०२४ रोजी दुपारी १४.२५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी मध्यरात्री ०३.३० वाजता दादर येथे पोहोचेल.

या दोन्ही शिक्षक विशेष ट्रेन कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, हरदा, इटारसी, रानी कमलापति स्टेशन, बीना, ललितपूर, टीकमगढ़, खड़गपूर, महाराजा छत्रसाल स्टेशन छतरपूर, खजुराहो, महोबा, बांदा, चित्रकूट धाम कर्वी, माणिकपूर, प्रयागराज जंक्शन, ज्ञानपूर रोड, वाराणसी, ओंरिहार, मऊ, भटनी आणि देवरिया या स्थानकांवर थांबणार आहे.

शिक्षकांच्या विशेष ट्रेनचे आरक्षण ३१ मार्च २०२४ रोजी दुपारी २.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथील नामांकित काउंटरवर उघडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *