दाक्षिणात्य अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; चाहत्यांना मोठा धक्का

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० मार्च । Daniel Balaji Passes Away: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. तमिळ सिनेमाचे नावाजलेले अभिनेते डॅनियल बालाजी यांचे निधन झालं आहे. हृदविकाराच्या झटक्याने डॅनियल यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. वयाच्या 48 व्या वर्षी डॅनियल बालाजी यांनी अखेरचा श्वास घेतला. छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर डॅनियल यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांच्या वाचवता आलं नाही. इतक्या कमी वयात अभिनेत्याचे निधन झाल्याने कलाकारांमध्ये शोककळा परसली आहे.

शुक्रवारी डॅनियल बालाजी यांना छातीत दुखू लागल्याने चेन्नईच्या कोटिवाकम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा जीव वाचेल अशी आशा होती, पण त्याला वाचवता आले नाही. रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने साऊथ इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

डॅनियल यांनी बहुतेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली होती आणि नकारात्मक भूमिका साकारण्यासाठी ते त्यांच्या चाहत्यांमध्ये प्रसिद्ध होते. काखा काखा, पोल्लाधवन, वेट्टय्याडू विलायाडू आणि वडा चेन्नई अशा अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्याचा दमदार अभिनय पाहायला मिळाला.

दिग्दर्शक मोहन राजा यांनी डॅनियल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “खूप दु:खद बातमी. फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये सामील होण्यासाठी तो माझ्यासाठी प्रेरणास्थान होता. एक चांगला मित्र. मला त्याच्यासोबत काम केल्याची आठवण येते. त्याच्या आत्म्याला शांती मिळो,” असे मोहन राजा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, डॅनियल बालाजी यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी पुरसाईवलकम येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार, 30 मार्च रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 48 वर्षीय अभिनेत्याच्या निधनाने त्याच्या चाहत्यांना आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकांना मोठा धक्का बसला आहे. आज इंडस्ट्रीतील लोक त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *