गव्हाच्या किंमती वाढू नये म्हणून सरकारनं घेतला मोठा निर्णय ; सविस्तर माहिती पहा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० मार्च । सध्या देशात लोकसभेच्या निवडणुकीचा (Loksabha Electio) रणसंग्राम सुरु झाला आहे. अशा स्थितीत कोणत्याही प्रकारे महागाई वाढू नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. निवडणुकीच्या काळात सर्वसामान्य जनतेला कमी दरात वस्तू मिळाव्यात, यासाठी सरकार विविध निर्णय घेत आहे. सध्या गव्हाच्या दरात (Wheat Price) वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं किंमती वाढू नयेत म्हणून खबरदारी घेतलीय. सरकार गहू आणि तांदळाच्या साठ्यावर लक्ष ठेऊन आहे. गव्हाची साठवणूक करु नये, साठवणुकीच्या संदर्भातील सर्व माहिती सरकारला देणं बंधनकारक असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गव्हाच्या किंमती वाढू नयेत म्हणून सरकारनं गहू साठा मर्यादा लावली होती. या साठा मर्यादेची मुदत 31 मार्चला संपत आहे. त्यामुळं गव्हाचा साठा करुन दर वाढण्याची शक्यता आहे. अशातच सरकारनं साठा जाहीर करण्याचे आदेश दिले आहे. यामुळं गव्हाच्या किंमती निंयत्रीत राहण्याची शक्यता आहे. याबाबत ग्राहक व्यवहार आणि अन्न पुरवठा मंत्रालयानं एक परिपत्रक देखील जाहीर केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *