Google Lookup : आता मोबाईलच करणार अनोळखी नंबरची ओळख; गुगल लवकरच देणार खास फीचर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ एप्रिल ।। Google Lookup Feature : देशात सध्या फोन कॉलच्या माध्यमातून होणारी फसवणूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळेच अनोळखी नंबरवरुन येणारे फोन ओळखणं गरजेचं झालं आहे. यासाठीच गुगलने आता पाउल उचललं आहे. आपल्या अँड्रॉईड फोनमध्ये आता गुगल अननोन नंबर ओळखणारं खास फीचर देणार आहे. यामुळे स्पॅम कॉल्सवर आळा बसणार आहे.

गुगलच्या या फीचरचं नाव ‘Lookup’ असं असणार आहे. यूजर्सना आपल्या फोनच्या सिस्टीममध्येच हे फीचर मिळेल. यामुळे यूजर्सना कोणतंही नवीन अ‍ॅप डाऊनलोड करावं लागणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे फीचर गुगलच्या ‘फोन’ अ‍ॅपमध्ये जोडण्यात येईल.

कुठे दिसणार माहिती?
यूजर्सना कॉल लॉगमध्ये हे ‘लुकअप’ फीचर मिळेल. सध्या कॉल हिस्ट्रीमध्ये एखाद्या काँटॅक्टवर क्लिक केल्यास ‘व्हिडिओ कॉल’, ‘मेसेज’ आणि ‘हिस्ट्री’ असे तीन पर्याय मिळतात. तर अनोळखी नंबरवर क्लिक केल्यास व्हिडिओ कॉल ऐवजी ‘अ‍ॅड कॉन्टॅक्ट’ हा पर्याय मिळतो. नव्या अपडेटनंतर याठिकाणी आता ‘लुकअप’ हा चौथा पर्यायही पहायला मिळेल. यावर टॅप करून यूजर्स अनोळखी नंबरबद्दल माहिती मिळवू शकतील.

गुगलच्या 127.0.620688474 या व्हर्जनमध्ये हे फीचर पहायला मिळालं आहे. हे फीचर सध्या केवळ जपानमधील यूजर्ससाठी रोलआउट कऱण्यात आलेलं आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये हे ग्लोबली लाँच होईल असं गुगलने स्पष्ट केलं. यामुळे आता यूजर्सना अननोन नंबर तपासण्यासाठी कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपची गरज भासणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *