नारळपाण्यामुळे शरीराला होणारे फायदे पुढीलप्रमाणे…

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ एप्रिल ।। नारळातील पाणी आपल्या आरोग्याच्या द़ृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे. नारळपाण्यामध्ये निरामय आरोग्याच्या द़ृष्टीने अनेक गुणधर्म आढळून येतात. त्यामुळेच नारळपाण्याचे सेवन करण्याची प्रथा पाश्चिमात्य देशांमध्येही पडू लागली आहे. नारळपाण्यामुळे शरीराला होणारे फायदे पुढीलप्रमाणे…

1) रक्तदाब नियंत्रणात येतो : नारळपाण्यामुळे रक्तपुरवठ्यात चांगली सुधारणा होते, असे वैद्यकीय संशोधनातून दिसून आले आहे. त्याचबरोबर रक्तदाब नियंत्रणात राखण्याचे कामही नारळपाण्यामुळे केले जाते. रक्तदाबामुळे हृदयावर होणारे दुष्परिणाम नारळपाण्यामुळे रोखले जातात.

2) रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याचे कामही नारळपाण्यामुळे होते.

3) नारळपाण्यात अनेक पौष्टिक घटक तसेच व्हिटॅमीन असतात या घटकांमुळे आपली प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते, त्यामुळे दररोज नारळपाणी पिणार्‍याला आजारांपासून दूर राहता येते. आपले शरीर साथीच्या रोगांना तसेच संसर्गाला बळी पडत नाही.

4) नारळपाण्यामुळे पचनक्रिया चांगली राहते, बद्धकोष्ठता होत नाही. या कारणामुळेच गर्भवती महिलांना नारळपाणी घेण्याचा सल्ला दिला जातो.

5) मिनरल्समुळे तसेच यातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियमच्या प्रमाणामुळे किडनीच्या रुग्णांसाठी नारळपाणी हे प्रभावी औषध ठरते.

6) त्वचारोगांसाठीही नारळपाणी उपयुक्त ठरते. तोंडावर पुरळ येणे, मुरूम येणे, फोड येणे अशा तक्रारींमध्ये नारळपाणी हा चांगला उपाय ठरतो. चेहर्‍यावरील सुरकुत्या नष्ट करण्याचे कामही नारळपाणी करते. त्यासाठी रात्री झोपताना चेहर्‍यावर नारळपाणी लावून झोपावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *