व्हॉट्स अ‍ॅप मध्ये येणार ‘हे’ दोन नवीन अपडेट ; काय असेल खास जाणून घ्या…

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ एप्रिल ।। व्हॉट्स अ‍ॅप आपल्या यूजर्सला अधिक चांगला अनुभव देण्यासाठी अॅपमध्ये काही नवीन अपडेट करत असते. या इन्स्टंट मेसेजिंग ॲपमुळे आपण सहजपणे आपल्या मित्र आणि कुटुंबाशी अधिक सोयीस्करपणे कनेक्टेड राहू शकतो.

रेपोर्टसनुसार असा दावा करण्यात आला आहे की व्हॉट्सॲप एका नवीन अपडेटवर काम करत आहे ज्यामध्ये आता यूजर्स इतरांच्या स्टेटसवर प्रतिक्रिया देऊन त्यांना लगेच प्रतिसाद देऊ शकतात.

‘WA Beta Info’नुसार व्हॉट्स अ‍ॅप लवकरच अॅपमध्ये दोन नवीन अपडेट आणणार आहे.
या नवीन अपडेट्समध्ये व्हॉट्सॲप अशा फीचरवर काम करत आहे ज्यामध्ये लोक इतरांच्या स्टेटसवर सोप्यापद्धतीने प्रतिक्रिया देऊन त्यांच्या भावना व्यक्त करू शकतात. हे ऑप्शन तुम्हाला स्टेटस स्क्रीनवरच दिसणार आहे.
दुसऱ्या अपडेटमध्ये व्हॉट्स अ‍ॅप यूजर्स त्यांचे आवडते कॉनटॅक्टला एका वेगळ्या ग्रुपमध्ये अॅड करू शकतील.
या अपडेटमध्ये जेव्हा तुम्ही आपल्या आवडते कॉनटॅक्टला किंवा ग्रुपला वेगळा गट देता तेव्हा हे फीचर त्या यूजर्सला सूचित करणारे कोणतेही अलर्ट पाठवत नाही.
व्हॉट्स अ‍ॅपने अजून पर्यंत अधिकृतपणे या अपडेट्सचा खुलासा केलेला नाही आणि म्हणूनच या नवीन अपडेटची पुष्टी करण्यासाठी यूजर्सला मेसेजिंग प्लॅटफॉर्मकडून अंतिम पुष्टीची प्रतीक्षा करावी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *