चारधाम यात्रेसाठी 15 लाख नोंदणी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ एप्रिल ।। गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथसह चारधामचे दर्शन करण्यासाठी देशभरातून भाविकांचा उत्साह दिसून येत आहे. अवघ्या 11 दिवसांत 15 लाख 12 हजारांहून अधिक भाविकांनी नोंदणी केली आहे. चारधाम यात्रा करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी जवळपास 15 लाख भाविकांनी चारधाम यात्रा केली होती. या वेळी हा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. चारधाम यात्रेसाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *