सायबर क्राईम रोखण्यासाठी पुण्यात जागरूकता, सतर्कतेचे धडे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ जुलै । वाढत्या डिजिटल व्यवहाराबरोबरच cyber crime चांगलेच अ‍ॅक्टीव्ह झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर cyber crime मोडीत काढण्यासाठी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ट्विटर, इन्स्ट्राग्राम, फेसबुकच्या माध्यमातून नागरिकांना सजग करण्याचे काम पुणे पोलिसांनी हाती घेतले आहे. जागरूकता आणि सतर्कतेचे गिरवून धडे, रहा सायबर गुन्हेगारांच्या एक पाऊल पुढे रहा, असेच आवाहन पुणे पोलिस आता करत आहेत.

फसवणूक झालेली रक्कम परत मिळविण्यासाठी गोल्डन अवरच्या महत्त्वाचा ठरत आहे. सायबर पोलिस ठाण्याकडे जानेवारी ते जुलै २०२१ दरम्यान ९ हजार २७३ तक्रारी आल्या आहेत.

सायबर गुन्हेगारांद्वारे फसवणूक केली जात असताना सायबर गुन्ह्यांमध्ये गोल्डन अवरचे महत्त्व सांगण्यात आले आहे.

सर्वप्रथम हेल्पलाईनवर संपर्क करा (७०५८७१९३७१) स्क्रीनशॉट वॉट्सअप करा, नंतर एफआयआरची औपचारिकता पूर्ण करा,

लँडलाईन नंबर, ईमेलद्वारे तक्रारीची स्थिती जाणा असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे.

जे नागरिक फसवणूक झाल्यानंतर लगेच पोलिसांशी संपर्क साधतात अशा नारिकांच्या गुन्ह्यातील रिकव्हरी रेट ४० टक्के आहे.
जर पोलिसांपर्यंत पोहचण्यात उशीर झाला तर त्याचे प्रमाण केवळ १० टक्के असल्याचे सायबर पोलिस सांगतात.

कसे आहे सायबर गुन्हेगारीचे प्रमाण
सायबर गुन्हेगारी ऑनलाइन बँकिंग, कार्ड फॉर्डचे प्रमाण ४५ टक्के, सोशल नेटवर्किंग संबंधित २५ टक्के, ऑनलाइन बिझनेस २२ टक्के, हॅकींग संबंधित २ टक्के, तर मोबाईल संबंधित सायबर गुन्हे ३ व इतर सायबरचे गुन्हे ३ टक्के आहे.

काय आहे गोल्डन अवर
गोल्डन अवर असा कार्यकाळ असतो ज्यामध्ये गेलेले पैसे परत मिळण्याची शक्यता अधिक असते.
सायबर पोलिसांकडे तक्रार गेल्यानंतर स्टॉप पेमेंट सूचना विविध पेमेंट करणार्‍या कंपनीच्या इंडिया नोडल अधिकार्‍यांना ताबडतोब पाठवली जाते.

तुमची तक्रार पोलिसांच्या करण्यात आलेल्या हॅकिंग/ डाटा चोरी, ऑनलाइन उद्योग, फसवणूक, सोशल नेटवर्क, एटीएम कार्ड या पाच युनिट पैकी एकाकडे पाठविले जाते.

चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांनी पुणे पोलिसांच्यावतीने सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या जनजागृतीबद्दल कौतुक केले आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर हॅन्डलवरून तसा संदेशच प्रसारित केला आहे.

सायबर पोलिसांची जनजागृतीपर संदेश
– तुमच्या बँक खात्यात पैसे टाकले आहेत अशा लिंकला क्लिक करू नका

– फेसबुक बनलंय प्रत्येकाच्या गळ्यातलं ताईत, फेक अकाऊंटचा बळी जाल, मित्र जोडण्याच्या घाईत

– सगळं स्वस्त नसतं मस्त, ऑनलाइन अ‍ॅडच्या फसव्या कारभारात बँक बॅलन्स होईल फस्त

– ऑनलाइन सावकारांपासून सावधान, इथे कर्ज देण्याआधी वसुली केली जाते

– गुडघ्याला बांधून बाशिंग करू नका लग्नाची घाई, कदाचित फैजल लपून बसला असेल लुटायला पाई पाई

– यंदा कर्तव्य आहे म्हणत शुभमंगल सावधान. आंतरपाटा पलीकडे गुन्हेगार असू शकतो.

– जर बनायचं असेल ऑनलाइन सौद्यांचा सरदार तर ओएलएक्स, क्विकर विक्रेत्यांची कागदपत्रे पडताळनी करा व्यवहार.

– खासगी गोष्टी सोशल करून नका सेक्सटॉर्शनच्या हनी ट्रॅपमध्ये अडकू नका.

– जर गुन्हेगारांना घालायचा असेल आळा, तर सायबर गुन्हा टाळा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *