डिहायड्रेशन रोखण्यासाठी करा ‘हे’ उपाय

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१ जुलै । आरोग्याची काळजी घेणे आणि स्वतःला हायड्रेट ठेवणे म्हणजेच शरीरातील पाणी कमी होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. यालाच डिहायड्रेशन असे म्हणतात. तज्ज्ञांच्या मते, डिहायड्रेशनच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर आजाराच्या समस्या उद्भवू शकतात. माणसाच्या शरीराचा एक तृतीयांश भाग पाण्याने व्यापलेला असतो. कोरड्या आणि दमट हवामानात भरपूर घाम आल्याने पाणी आणि मीठ यांचे संतुलन बिघडते. याकरिता, शरीराचे सामान्य तापमान राखण्यासाठी शरीराला अतिरिक्त पाण्याची आवश्यकता असते. एनएचएस नुसार, जेव्हा शरीरातील पाणी कमी होते तेव्हा तहान लागणे, गडद पिवळा आणि तीव्र वास असलेली लघवी, चक्कर येणे किंवा डोके हलके झाल्यासारखे वाटणे, थकवा जाणवणे, तोंड, ओठ आणि डोळे कोरडे पडणे, लघवी कमी होणे, यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

– वर्षभर आपल्याला उपलब्ध असलेल्या फळे आणि भाज्यांमध्ये पाणी मुबलक प्रमाणात असते. पीच, कलिंगड, स्ट्रॉबेरी, अननस आणि पपनस या फळांमध्ये पाणी जास्त प्रमाणात असते. ओवा, टोमॅटो, मुळा आणि काकडी यामध्येही पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या भाज्या आहेत. त्याचा समावेश आहारात करणे आवश्यक आहे. याशिवाय तेलकट आणि मसालेदार पदार्थांऐवजी दिवसभर पाणीयुक्त फळे आणि भाज्या आहारात घेणे ही डिहायड्रेशन टाळण्यासाठी सर्वात चांगली पद्धत आहे.

– बऱ्याच जणांना असे वाटते की, डिहाड्रेशन होत असेल तर फळांचा रस किंवा एनर्जी ड्रिंक घेणे पुरेसे आहे, तर असे नाही. डिहायड्रेशनमुळे शरीरातील आवश्यक क्षार आणि पाणी शरीराबाहेर टाकले जाते. त्यामुळे यावेळी ज्यामुळे शरीर रिहायड्रेट होऊ शकते, असे पेय यावेळी पिणे गरजेचे आहे. डिहायड्रेशनचा उपचार ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन शीतपेयांसह केला जातो. ओटीसी असलेल्या अमृतांजन हेल्थ केअरचे फ्रूटनिक इलेक्ट्रो+ यावर प्रभावी आहे. कारण ते श्रम किंवा निर्जलीकरणामुळे गमावलेले क्षार आणि द्रव पुनर्प्राप्त करण्यात मदत करते. यामध्ये साखर, ग्लुकोज, सोडियम आणि पोटॅशियमचे योग्य मिश्रण असते. तसेच गमावलेले द्रवपदार्थ शरीराला परत मिळवून देण्यात मदत होते. फ्रूटनिक इलेक्ट्रो+ हे सफरचंद फळांचे एक नैसर्गिक पेय आहे जे ऊर्जा वाढवते. इलेक्ट्रोलाइट्सची कमी पूर्ण करते आणि व्हिटॅमिन सी देते. अति परिश्रम, उष्माघात आणि त्यामुळे येणारा ताण आणि विविध प्रकारच्या खेळांमुळे झालेल्या निर्जलीकरणातून बरे होण्यासाठी हे उत्तम आहे. ग्रामीण भागात निर्जलीकरणाचा सामना करण्यासाठी कोणत्याही सरकारी आरोग्य केंद्रावर मोफत ओआरएस सोल्यूशन किंवा वैद्यकीय उपचार मिळू शकतात.

– सोडा, कॉफी, मद्य आणि चहामुळेही शरीरातील पाण्याचं प्रमाण काही वेळा कमी होऊ शकतं. त्यामुळे शक्यतो ही पेये टाळावीत. पेय प्यायल्याने उत्साहवर्धक आणि ताजेतवाने वाटावे यासाठी अमृतांजन हेल्थ केअरच्या पोतडीतील फ्रूटनिकसारखे फ्लेवर्ड पाणी किंवा फळांचे रस वापरून पहा. संत्र आणि सफरचंदच्या फ्लेवर्समध्ये येणारा फ्रूटनिक ज्यूस नैसर्गिक फळांच्या चांगल्या गुणांनी युक्त आहे ज्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. कडक उन्हात हायड्रेट राहण्यासाठी ती आवश्यक असतात.

– अल्कोहोल मूत्रवर्धक म्हणून कार्य करते. रक्तातील द्रवपदार्थ मूत्रपिंड, मूत्रमार्ग आणि मूत्राशयाद्वारे इतर द्रवपदार्थांच्या तुलनेत खूप वेगाने शरीराबाहेर टाकला जातो. अल्कोहोल घेत असताना पुरेसे पाणी न प्यायल्यास तुमच्या शरीरातील पाणी लवकर कमी होऊ शकते. सर्व ऋतूंमध्ये स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी अल्कोहोलचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो.

– हायड्रेटेड राहण्यासाठी पाणी अत्यावश्यक आहे. जर तुम्ही व्यायाम करत असाल तर पाणी पिण्याचे प्रमाण दुप्पट होणे महत्त्वाचे आहे. वर्कआउटच्या किमान चार तास आधी भरपूर पाणी प्या. व्यायाम करताना दर 10-15 मिनिटांनी स्वतःला हायड्रेट करा. तहान लागली नसली तरीही दुपारी 2 वाजेपर्यंत 1.5 लिटर पाणी प्या. वारंवार तहान लागणे हे शरीरातील डिहायड्रेशन सूचित करते. पाण्याची बाटली नेहमी सोबत ठेवा. जेणेकरून तुम्हाला पाणी सहज उपलब्ध होईल. जास्त पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी तुम्ही अॅपदेखील वापरू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *