Bank Account : तर होईल तुमचे बँक खाते होईल निष्क्रिय

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जुन । सध्या जवळपास सर्वच लोकांकडे एक अथवा त्यापेक्षा अधिक बँक खाते (Bank Account) आहेत. अनेक लोक त्यांचा नियमीत वापर करतात. तर काही जण या खात्याकडे दुर्लक्ष करतात. खाते एका पेक्षा अधिक असतील अथवा बँकेच्या व्यवहाराशी (Bank Transactions) रोजचा थेट संबंध येत नसेल तर हा प्रकार दिसून येतो. बँक खात्यामुळे अनेक व्यवहार झटपट होतात. या व्यवहारांचा तपशील हाती असल्याने कधी, कुणाला, किती रुपये दिले, याचा तपशील प्राप्त होतो. एखाद्या बँकेत खाते उघडले म्हणजे सर्व झाले असे नाही. हे खाते सुरु राहण्यासाठी तुम्हाला ही गोष्ट नियमीत करणे गरजेचे आहे. नाहीतर एक दिवस खाते बंद होईल आणि त्याची खबरबात तुम्हाला पण लागणार नाही..

नवीन खाते
नियमानुसार, करंट, सॅलरी आणि सेव्हिंग खाते असे प्रकार असतात. जे कोणते खाते असेल ते नियमीतपणे, महिन्यातील काही दिवस सुरु असणे आवश्यक आहे. म्हणजे त्यात व्यवहार होणे गरजेचे आहे. प्रत्येक बँक खात्यासाठी वेगवेगळे नियम आहेत. जास्त करुन नोकरी बदलताना, बदली होताना बँक खाते पण बदलतात. सोयीनुसार हा बदल करण्यात येतो. त्यामुळे ते स्वतंत्र खाते उघडतात. अथवा कंपनी त्यांना नवीन खाते उघडून देते.

का होते बंद खाते
नवीन बँकेमुळे जुन्या खात्याकडे दुर्लक्ष होते. जास्त दिवस व्यवहार न झाल्याने बँक खाते निष्क्रिय होते. हे बँक खाते पूर्णपणे बंद होते. पण खाते पूर्णपणे बंद होत नाही. ते निष्क्रिय असते. काही महत्वाची कागदपत्रे दिल्यानंतर बँक तुमचे खाते लागलीच सुरु करते. अनेकदा कंपन्या बदलताना बँका बदलतात. त्यावेळी जुन्या खात्याची अचानक आठवण येते. तुमचे नाव, जन्मतारीख आणि मोबाईलचा तपशील देताच तुमचे जुने निष्क्रिय खाते दिसते.

किती दिवसांनी होते बंद
एखादे खाते उघडल्यानंतर तुम्ही जर दोन वर्षांत कधीच वापर केला नाही तर बँक खाते निष्क्रिय होते. खात्यात कमीत कमी पैसे टाकणे अथवा पैसे काढणे असा व्यवहार झाला पाहिजे. दोन वर्षात तुम्ही खात्यात काहीच व्यवहार केला नाही तर हे खाते बंद होते. म्हणजे हे खाते पुढे निष्क्रिय होते. ते सुरु करण्यासाठी पुन्हा केवायसी कागदपत्रांची पुर्तता करावी लागते. जर हे खाते तुम्हाला सुरु ठेवायचे असेल तर त्यात व्यवहार करा. अथवा तुम्हाला खाते बंद करायचे असेल तर बँकेत तसा अर्ज करा.

तर खाते हस्तांतरीत करा
तुमची बदली झाली. तुम्ही संबंधित बँक शाखेपासून दुर असाल तर पूर्वीच्या शाखेत जाऊन खाते नवीन ठिकाणी हस्तांतरीत करण्यासाठी अर्ज करा. तसेच बँका वेळोवेळी केवायसी अपडेट करण्यासाठी अधिकृत ईमेल, मॅसेज करतात. त्याआधारे कोणत्याही लिंकवर न जाता, स्वतःच्या ऑनलाईन बँका खात्यात जाऊन तुम्ही केवायसी अपडेट करु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *