इलॉन मस्क यांची घोषणा; ‘एक्स’वर येणार हे नवे फीचर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ सप्टेंबर । इलॉन मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर अनेक महत्त्वपूर्ण बदल केले. ट्विटरचे नाव ‘एक्स’ केल्यानंतर अनेक फीचर्स आणण्याची घोषणा मस्क यांनी केली. लवकरच एक्सवरून मोबाइल क्रमांकाविना यूजर्सना ऑडिओ-व्हिडीओ कॉल करता येणार आहे. त्याबाबतची घोषणा मस्क यांनी एक्सवरील एका पोस्टच्या माध्यमातून केली. मस्क यांनी पोस्टमध्ये म्हटले, एक्सवर लवकरच ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलिंगचा फीचर आणले जात आहे. हे फीचर आयओएस, ॲण्ड्रॉइड, मॅक तसेच कॉम्प्युटरवरही वापरता येणार आहे. यूजर्सना मोबाइल क्रमांक देण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे.

सर्वसमावेश ॲपचे स्वप्न
इलॉन मस्क यांना एक्सला सर्वसमावेशक ॲप म्हणून नव्याने सादर करायचे आहे. यापूर्वी एक्सने व्हेरिफाईड यूजर्ससाठी प्रदीर्घ पोस्ट, मोठे व्हिडीओ पोस्ट करण्याची सुविधा दिली होती.
नुकतेच क्रिएटर्ससाठी मॉनेटायजेशन तसेच व्हेरिफाईड कंपन्यांसाठी नोकरभरतीची सुविधाही दिली.
केवळ मायक्रो ब्लॉगिंग साइटपुरते मर्यादित न राहता पेमेंट सेवा, ऑडिओ-व्हिडीओ कॉलिंगसह अन्य नव्या सेवा सादर करण्याचा मस्क यांचा मानस आहे.

मस्क-झुकरबर्ग यांच्या स्पर्धा
मार्क झुकरबर्ग यांच्या मेटाच्या अख्यतारितील फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्स ॲपच्या स्पर्धेत इलॉन मस्क यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहे.
इन्स्टाग्रामने नुकतेच एक्सप्रमाणे ‘थ्रेड’ ॲप सुरू मस्क यांच्यापुढे आव्हान निर्माण केले.
व्हॉट्स ॲपवरील कॉलिंग फीचर आता एक्सवर आणत मस्क यांनी झुकरबर्ग यांना उत्तर.

देशांमध्ये एक्सवर बंदी आहे.
चीन, इराण, म्यानमार, उत्तर कोरिया, रशिया, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *