स्मार्टफोनचं व्यसन; ‘या’ आजारांचा धोका, काय आहे Nomophobia?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ जुन ।। स्मार्टफोन हा आता जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. मात्र यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. फोनचा सतत वापर करणं किंवा मोबाईल फोनशिवाय क्षणभरही जगणे शक्य नसल्यास Nomophobia नावाचा आजार होऊ शकतो, असं अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे.

शरीरासाठी हे इतक घातक आहे. यामुळे अनेक आजारांचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. स्मार्टफोनचं व्यसन लागणं याला नोमोफोबियाला म्हणतात. जगभरातील सर्वेक्षणात, ८४% स्मार्टफोन युजर्सनी कबूल केलं की ते त्यांच्या फोनशिवाय एक दिवसही राहू शकत नाहीत.

लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत हल्ली प्रत्येकाकडे स्मार्टफोन हा असतोच. मात्र त्याचा जसा फायदा आहे, तसा तोटा देखील आहे. नोमोफोबियाचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे कोणते आजार होऊ शकतात ते जाणून घेऊया…

पाठीच्या हाडावर परिणाम
युनायटेड कायरोप्रॅक्टिक असोसिएशनच्या मते, फोनच्या सतत वापरामुळे खांदा आणि मान जास्त प्रमाणात वाकतात, ज्यामुळे पाठीच्या कण्यावर विपरित परिणाम होतो.

फुफ्फुसाच्या समस्या
सतत फोन वापरल्याने मान वाकते, त्यामुळे शरीराला पूर्ण किंवा खोल श्वास घेण्यास त्रास होतो. त्याचा फुफ्फुसांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

टेक्स्ट नेकचा प्रॉब्लेम
सतत फोनच्या स्क्रीनकडे पाहिल्याने मान खूप दुखते… ज्याला टेक्स्ट नेक म्हणतात. सतत टेक्स्ट मेसेज पाठवणाऱ्या आणि वेब ब्राउझिंग करणाऱ्यांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते.

कॉम्पुटर व्हिजन सिंड्रोम
अमेरिकन व्हिजन काऊंन्सिलने केलेल्या सर्वेक्षणात असं आढळून आलं आहे की, ७०% लोक स्मार्टफोनच्या स्क्रीनकडे पाहताना डोळे मिटतात, जे नंतर कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम बनतं. यामध्ये डोळ्यांना सूज येण्याची आणि अंधुक दिसण्याची समस्या उद्भवते.

किडनी निकामी होऊ शकते
एका रिपोर्टनुसार, जगातील सुमारे ७५% लोक त्यांचे स्मार्टफोन बाथरूममध्ये घेऊन जातात. यामुळे प्रत्येक ६ पैकी एका फोनवर ई-कोलाय बॅक्टेरिया आढळतात. या बॅक्टेरियामुळे डायरिया आणि किडनी निकामी होण्याची शक्यता असते.

झोपेच्या समस्या
चेहऱ्यासमोर स्मार्टफोनचा प्रकाश दोन तास चमकला तर मेलाटोनिन २२% कमी होते. त्यामुळे झोपेच्या समस्या सुरू होतात. स्मार्टफोनच्या व्यसनामुळे १२ टक्के लोकांच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम झाल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

आत्मविश्वासाचा अभाव
एका सर्वेक्षणात, ४१ टक्क्यांहून अधिक लोकांनी कबूल केलं की ते एखाद्यासमोर कोणत्याही गोष्टीतून वाचण्यासाठी त्यांच्या स्मार्टफोनचा वापर करत आहेत. असं केल्याने आत्मविश्वास कमी होऊ शकतो. त्यामुळे हे टाळावं.

चिंता वाढू शकते
एका सर्वेक्षणात ४५ टक्के स्मार्टफोन युजर्सनी कबूल केलं की त्यांना त्यांचा फोन किंवा इतर गोष्टी हरवण्याची काळजी वाटते. ज्यावरून लक्षात येतं की फोनमुळे स्ट्रेसही वाढत आहे. फोनचा अतिवापर तुम्हाला कुटुंब आणि मित्रांपासून दूर नेऊ शकतो, असं तज्ज्ञांचे मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *