अजित पवार गटाकडून शरद पवार गटातील आमदारांविरोधात अपात्रता याचिका दाखल

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२२ सप्टेंबर । राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या गटातील विधानसभा आणि विधानपरिषद आमदारांविरोधात अपात्रता याचिका दाखल केल्या आहेत. अशातच अजित पवार गटही आक्रमक झाला आहे. अजित पवार गटाकडून शरद पवार यांच्या गटातील आमदारांविरोधात अपात्रता याचिका दाखल केल्याची माहिती सूत्रांनी आली आहे. यात जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांचा समावेश आहे.

‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यालयात शरद पवार यांच्या गटात असलेल्या आमदारांविरुद्ध अजित पवार गटाकडून अपात्रतेसंदर्भात याचिका दाखल केली आहे. त्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार, आमदार राजेश टोपे, आमदार अनिल देशमुख, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार मानसिंग नाईक, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार रवींद्र भुसारा आणि आमदार बाळासाहेब पाटील यांचा समावेश आहे.

पण, आमदार नवाब मलिक, आमदार सुमन पाटील, आमदार अशोक पवार आणि आमदार चेतन तुपे यांचं नाव वगळण्यात आलं आहे. नवाब मलिक आणि चेतन तुपे यांनी आपली भूमिका अद्यापही जाहीर केली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *