KBC 15: सात कोटींच्या जॅकपॉटचं उत्तर तुम्हाला माहितेय का?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ सप्टेंबर । बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या कौन बनेगा करोडपतीच्या (KBC) १५ व्या पर्वात आठवड्याच्या सुरुवातीलाच या सीझनचा दुसरा करोडपती मिळाला. उत्तर प्रदेशच्या आझमगढमधील अनवाक या छोट्याशा शहरातील स्टोअर मॅनेजर जसनील कुमार याने एक कोटी रुपये जिंकले, यासोबतच एक आलिशान कारही मिळवली. पण सात कोटी रुपयांच्या जॅकपॉट प्रश्नाच्या उत्तराबद्दल त्याला खात्री नव्हती आणि त्यामुळे त्याने शो सोडला.

 

जसनीलला एक कोटी रुपयांसाठी कोणता प्रश्न विचारण्यात आला होता?

कोणी केलेल्या यज्ञानंतर उरलेल्या सोन्याचा वापर पांडवांनी आपला खजिना भरण्यासाठी आणि अश्वमेध यज्ञासाठी केला?
A. विकर्ण
B. मारुत
C. कुबेर
D. लिखित

या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला माहिती आहे का? याचं उत्तर आहे बी मारुत.

जसनीलने सात कोटी रुपयांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, पण उत्तराबद्दल त्याला खात्री नव्हती. त्यामुळे त्याने क्वीट केले. परंतु नंतर त्याने या प्रश्नाचे अचूक उत्तर दिले. त्यामुळे प्रेक्षकांसह बिग बींनाही रुखरुख लागून राहिली. परंतु खेळ सोडल्यामुळे त्याला सात कोटींच्या रकमेला गवसणी घालता आली नाही.

जसनील कुमारला विचारलेला ७ कोटी रुपयांचा प्रश्न काय होता?

भारतीय वंशाच्या लीना गाडे या खालीलपैकी कोणती शर्यत जिंकणाऱ्या पहिल्या महिला रेस इंजिनियर आहेत?

A. इंडियानापोलिस 500
B. २४ तास ले मॅन्स
C. १२ तास सेब्रिंगचे
D. मोनॅको ग्रांप्री

खेळ सोडल्यानंतर जसनीलने ‘बी. २४ तास ले मॅन्स’ हा पर्याय निवडला, जे योग्य उत्तर आहे.

विशेष म्हणजे खुद्द लीना गाडेंनी याविषयी पोस्ट शेअर केली आहे. ‘हा माणूस जवळजवळ शून्यातून वर आला आणि त्याची एकच इच्छा होती, की त्याच्या कुटुंबासाठी आणि पालकांसाठी मातीच्या कच्चा घराऐवजी पक्के घर बांधावे. तो एका दुकानात काम करतो, त्याला त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी सांगितले होते की तो काहीही जिंकू शकणार नाही कारण काहीच माहिती नसलेला तो ‘कोणीही नव्हता’. पण त्याने सर्वांना चुकीचे सिद्ध केले.’ अशा भावना गाडेंनी व्यक्त केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *