शुभमन गिलला डेंग्यू: वर्ल्डकपचा ​​पहिला सामना खेळण्याबाबत शंका

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ ऑक्टोबर | टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिलची डेंग्यू चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. विश्वचषक 2023 मध्ये भारताचा पहिला सामना रविवारी म्हणजेच 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. या सामन्यात गिलच्या खेळावर साशंकता आहे.

वृत्तानुसार, गिलने गुरुवारी एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या संघाच्या नेट सेशनमध्येही भाग घेतला नाही. गिलची शुक्रवारी म्हणजेच आज दुसरी चाचणी होणार असून त्यानंतर खेळण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

चेन्नईला पोहोचल्यापासून गिलला खूप ताप
बीसीसीआयच्या सूत्राने पीटीआयला सांगितले की, ‘चेन्नईला पोहोचल्यापासून शुभमनला खूप ताप आहे. त्याच्या चाचण्या केल्या जात आहेत. शुक्रवारी त्याच्या आणखी चाचण्या होणार असून सलामीच्या सामन्यात त्याच्या खेळण्याबाबत निर्णय घेतला जाईल. सूत्राने सांगितले की, गिलची डेंग्यूची चाचणी केली जात आहे आणि त्यामुळे तो काही सामने खेळू शकणार नाही.

गिल 2023 मध्ये एकदिवसीय सामन्यात भारताचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू
शुभमन गिल यंदा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. गिल 2023 मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. सलामीवीराने 2023 मध्ये 20 एकदिवसीय सामन्यांमध्ये 72.35 च्या सरासरीने आणि 105.03 च्या स्ट्राइक रेटने 1,230 धावा केल्या आहेत. त्याच्या 6 वनडे शतकांपैकी 5 या वर्षात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *