कायम पायांच्या टाचा दुखतात? या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑक्टोबर | Liver Health : शरीराचे कुठलेही दुखणे चांगले नाहीच. पण तुमच्या शरीराच्या बाहेरील भागाच्या दुखण्याचा संबंध तुमच्या आंतरिक अवयवांशीही असू शकतो याचा विचार तुम्ही कधी केलाय का? तुम्ही काही लक्षणांकडे दूर्लक्ष केल्यास तुम्हाला आजारांच्या रुपात त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकते.

द योगा इंस्टीट्यूट ऑफिशियलनुसार, यकृतात बिघाड झाल्यास पायाच्या टाचांचे दुखणे वाढते. तुमच्या शरीरात फॅटी लिव्हर, ब्लड सर्क्युलेशन, अशुद्ध रक्त असणे ही याच आजारांची लक्षणं आहेत. चला तर मग यकृतासंबंधित रोगांबाबत सविस्तर जाणून घेऊया.

पायांच्या टाचांना सूज येणे
पायाच्या टाचांमध्ये सूज किंवा चालताना दुखणे यांसारख्या समस्या सामान्य आहेत. मात्र या लक्षणांकडे टाळाटाळ केल्यास तुमच्या यकृतासाठी ते घातक ठरू शकते. द योगा इंस्टीट्यूटनुसार, जेव्हा यकृतात द्रव साचण्यास सुरुवात होते तेव्हा फॅटी लिव्हर होतो. आणि पायाच्या टाचा सुजतात.

टाचा गरम असणे
जास्त चालल्याने काही लोकांच्या टाचा गरम होतात. तर काही लोकांना बूटांमुळे टाचांमध्ये उष्णता जाणवते. मात्र हे संकेत लिव्हर माल्फंक्शनचेही असू शकतात. अर्थात यकृतात रक्ताची शुद्धता न होणे.

टाचांना खाज येणे
हे लक्षण जाणवल्यास उशीर करू नका. हार्ट फेल झाल्यास टाचांमध्ये खाज येऊ शकते. हार्ट फेल्युअर किंवा यकृतात बिघाड झाल्यास टाचांना खाज येते.

पायांची नखे फार मोठी दिसणे
पायांमध्ये निळसर दिसणाऱ्या व्हेन्सना स्पायडर व्हेन्स असे म्हणतात. या टाचांमध्ये दिसू शकतात. शरीरातील अॅस्ट्रोजन वाढण्याचे हे महत्वाचे लक्षण असू शकते. जेव्हा यकृत काम करणे बंद करते तेव्हा शरीरात अॅस्ट्रोजेन हार्मोन वाढतो. (Health)

टाचांवर डाग, धब्बे
काही लोकांच्या टाचांवर आणि पायांवर डाग, धब्बे दिसतात. याचा अर्थ तुमच्या शरीरात ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होत नाहीये. यामुळे यकृताचे कार्य ठप्प पडू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *