Pimpri: पिंपरी चिंचवड मध्ये गॅस चोरी करताना टँकरचा भीषण स्फोट; 3 स्कूल बस जळून खाक

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑक्टोबर | पिंपरी चिंचवडमधील ताथवडे परिसरात रविवारी रात्री धक्कादायक घटना घडली. गॅस चोरी करत असताना टँकरचा स्फोट झाला आहे. यात तब्बल ९ टाक्यांचा स्फोट झाल्याची माहिती आहे. जेथे आग लागली तेथून जवळच शाळा, हॉस्टेल आणि रहिवाशी बिल्डिंग होत्या. यात जीवितहानी झालेली नाही, पण तीन स्कूल बस जळून खाक झाल्या आहेत.

अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मे तिरूपती करियरचे २१ टन क्षमतेचे बुलेट (टँकर) आहे. त्यात प्रोपिलीन गॅस होता. त्या बुलेटमधून (टँकर) अवैधरित्या घरगुती १४.९ किलोग्रॅम आणि कमर्शियल सिलिंडरमध्ये गॅसचा भरणा करण्यात येत असण्याचा प्राथमिक अंदाज आहे.

https://x.com/ANI/status/1711104592199741521?s=20

गॅसची गळती झाल्यानंतर आग लागली असावी आणि भीतीपोटी कार्यरत कर्मचारी घटनास्थळापासून पळून गेले असावेत. त्यामुळे घटनास्थळी कोणीही जखमी अवस्थेत आढळून आले नाही.

घटनास्थळी २७ सिलिंडर
घटनास्थळी एकूण २७ सिलिंडर मिळाले आहेत. आग पूर्णपणे विझवली आहे, परंतु कुलिंग ऑपरेशन तथा गॅस डिसीपीएट करण्याचे कार्य अद्याप सुरू आहे. पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्राच्या नियंत्रण कक्षास रात्री अकरा वाजता आग लागल्याची माहिती मिळाली होती.

घटनास्थळी सिलिंडरचे मोठमोठे स्फोट होत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पिंपरी, थेरगाव, प्राधिकरण, राहटणी, चिखली, भोसरी,तळवडे अग्निशमन पथके त्याचप्रमाणे हिंजवडी एमआयडीसी आणि पीएमआरडीएचे अग्निशमन दल मदतीस धावून आले होते. (Latest Marathi News)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *