प्रदूषण कमी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२८ डिसेंबर ।। पिंपरी-चिंचवड शहरात वायू, ध्वनी तसेच, जलप्रदूषण वाढले आहे. दिवसेंदिवस धुळीचा त्रास वाढतच आहे. वाढते प्रदूषण कमी करून शहरात स्वच्छ व ताजी हवा करण्यासाठी महापालिकेकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. असे करूनही प्रदूषण अतिधोकादायक पातळीवर पोहचत असल्याने महापालिकेने आता प्रदूषण करणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला असून, कारवाई मोहिम तीव— केली आहे. प्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

शहरात अनेक चौकात एअर प्युरिफिकेशन सिस्टीम बसविण्यात आली आहे. सभोवतालची हवा स्वच्छ करण्यासाठी व हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठी या पद्धतीचा उपयोग होतो. यामुळे चौकातील 50 मीटर त्रिज्येमधील वायुप्रदूषण कमी केले जाते. नऊ पातळ्यांवर दूषित हवा गाळण्याची प्रक्रिया पद्धत वापरली जाते. सभोवतालच्या हवेचे ऑनलाइन निरीक्षण करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

धूळ नियंत्रणासाठी ‘ट्रक मॉन्टेड फॉग कॅनन’
शहरातील 18 मीटर व त्यापेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांवर ट्रक मॉन्टेड फॉग कॅनन या पाच वाहनांद्वारे पाण्याचे तुषार उडवून हवेतील धूळ कमी केली जात आहे. वॉटर मिस्ट तंत्रज्ञान वापरून मोबाईल डस्ट सप्रेशन व्हेईकल म्हणून डिजाईन केलेले हे वाहन आहे. रस्त्यांवरील जंक्शन, इमारती पाडणे, कचराकुंड्यांच्या परिसरातील हवेतील धूळ नियंत्रित करण्यासाठी ही वाहने वापरली जातात. तसेच, झाडांवर साचलेली धूळ ही या वाहनांद्वारे पाण्याचे तुषार फवारून खाली बसविली जात आहे.

रोड वॉशरच्या दोन वाहनांद्वारे शहरातील 18 मीटर व त्यापेक्षा अधिक रुंदीचे रस्ते साफ केले जात आहेत. बांधकाम राडारोडा वाहतूक करणार्‍या वाहनांतून पडलेली माती व चिखल या वाहनांद्वारे साफ केली जाते. एका शिफ्टमध्ये 40 किलोमीटर अंतराचा रस्ता धुऊन घेतला जातो. रस्त्यांसोबत पुतळे व उपकरणे धुण्यास हे वाहन वापरले जात आहे. या सर्व वाहनांना किलोमीटरनुसार पैसे दिले जातात.

या सर्व वाहने व कामासाठी 30 कोटींपेक्षा अधिकचा खर्च महापालिकेने केला आहे. त्याद्वारे शहरातील वायू प्रदूषण कमी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, असे करूनही प्रदूषण कमी होत नसल्याचे महापालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. शहरात प्रदूषण करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई तीव— केली आहे. प्रसंगी फौजदारी गुन्हे नोंदविण्याचा नियोजन प्रशासनाने केला आहे. कारवाईसह जनजागृतीवर भर दिला आहे.

प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेकडून ठोस उपाययोजना
पिंपरी-चिंचवड शहरात राहण्यास मोठी पसंती दिली जात आहे. लोकवस्ती वाढत असल्याने सर्वत्र टोलेजंग गृहप्रकल्प उभे राहत आहेत. खासगी वाहनांची संख्याही वाढली आहे. बांधकामे व बेसुमार वाहनांमुळे शहरातील हवा खराब झाली आहे. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाकडून महापालिकेस वाहने तसेच, चौकाचौकांत लावण्यासाठी यंत्रे लावण्यात आली आहेत. प्रदूषण करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. प्रदूषण करणार्‍या नागरिक, संस्था, कारखाने व व्यावसायिकांवर कारवाई केली जात आहे. असे महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.

धूलिकण जमिनीवर आणण्यासाठी ‘ड्राय मिस्ट बेस्ड फाउंटन’
ड्राय मिस्ट बेस्ड फाउंटन सिस्टीम ही यंत्रणा शहरात 23 ठिकाणी बसविण्यात आली आहे. या यंत्रणेद्वारे उच्चदाब पंप व विशेष नोजल वापरून धुके तयार करण्यात येतात. हवेतील धूलिकण जड बनवून कमी केले जातात. ते जमिनीवर खाली आणले जातात. त्यामुळे जवळच्या भागात कण उडण्यास प्रतिबंध होतो. हवेची आर्द्रता, तापमान कमी होते. वातावरण थंड राहण्यास मदत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *