Horoscope Today दि. १७ मार्च २०२६ ; आज पुढील गोष्टींचा अंदाज बांधवा. . …. ..; पहा बारा राशींचं भविष्य —

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ मार्च २०२६ ।।

मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)
तुमच्या व्यक्तिमत्वाची उत्तम छाप पडेल. व्यापारी वर्गाला चांगला आर्थिक लाभ होईल. नवीन मित्र जोडाल. झोपेची तक्रार जाणवेल. तरुण वर्गात अधिक वेळ घालवाल.

वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)
व्यवहारी बुद्धिमत्ता वापराल. व्यावहारिक कल्पकता वापराल. पुढील गोष्टींचा अंदाज बांधवा लागेल. काही बाबी उघडपणे बोलणे टाळाल. अधिकारी व्यक्तींची गाठ घ्यावी लागेल.

मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)
मनातील आकांक्षा पूर्ण होतील. चांगली संगत लाभेल. कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. मोठ्या लोकांच्या संगतीत वावराल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल.

कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)
मानसिक ताणापासून दूर राहावे. घरातील वडीलधार्‍या व्यक्तींचे मत विरोधी वाटू शकते. अंगीभूत कलागुण विकसित होण्यास वाव द्यावा. अति विचार करणे टाळावे. पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात.

सिंह राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)
जोडीदाराशी विचार-विनिमय कराल. भागीदारीत नवीन योजना आमलात आणाल. मुलांच्या हट्टीपणा कडे लक्ष ठेवा. तुमच्यातील धार्मिकता वाढीस लागेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.

कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)
पत्नीची प्रगती होईल. तुमचा जनसंपर्क वाढेल. सर्दी, खोकला यांसारखे त्रास संभवतात. जुगारातून लाभ संभवतो. गुंतवणुकीचा नवीन पर्याय शोधाल.

तूळ राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)
पत्नीचा वरचष्मा राहील. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवावा लागेल. आरोग्यात सुधारणा होईल. जवळचा प्रवास जपून करावा. कामाचा जोम वाढेल.

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)
बोलतांना सारासार विचार करून बोलावे. कसलाही उतावीळपणा करायला जाऊ नये. कौटुंबिक खर्चाचे योग्य नियोजन करावे. घरात नातेवाईक जमा होतील. दिवस हसत-खेळत घालवाल.

धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)
रागाचा पारा आवरता घ्यावा लागेल. आततायीपणे वागू नये. कामाचा जोम वाढीस लागेल. काही अनपेक्षित बदल संभवतात. नातेवाईकांशी मतभेदाची शक्यता आहे.

मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope In Marathi)
सामुदायिक गोष्टीपासून दूर राहावे. स्त्रीवर्गापासून सावधानता बाळगावी. धार्मिक यात्रा कराल. प्रवासात सावधानता बाळगावी लागेल. वादविवादात सामील होणे टाळा.

कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope In Marathi)
मनमोकळ्या गप्पा मारता येतील. तुमच्या संभाषण कौशल्यावर सर्व खुश होतील. व्यावहारिक चातुर्य दाखवून द्याल. कौटुंबिक जबाबदारी पेलाल. हातातील कला जोपासावी.

मीन राशिभविष्य (Pisces Horoscope In Marathi)
वेळेचे महत्व जाणून वागावे. कोणालाही शब्द देतांना विचार करावा. व्यावसायिक लाभाचे योग्य नियोजन करावे. चटपटीत पदार्थ खाल. आवडी-निवडी बाबत दक्ष राहाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *