पिंपरी चिंचवड ; गॅस सिलेंडर माफिया ह्यांच्या विरोधात मोका कायदा अंतर्गत कारवाई करण्यात यावी ; सचिन काळभोर सामाजिक कार्यकर्ते

Spread the love

पिंपरी-चिंचवड सामाजिक कार्यकर्ता सचिन काळभोर यांच्या निवेदनाची दाखल घेत ‘त्या’ नऊ स्फोटांप्रकरणी चार पोलीस निलंबित, दोन अधिकाऱ्यांचा समावेश

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० ऑक्टोबर | पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे ह्या ठिकाणी गॅस सिलेंडर चोरुन भरण्याचा प्रयत्न करत असताना स्फोट झाला असून मोठा अपघात टळला असून जीवीत हानी झाली नाही त्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस ह्यांनी ताबडतोब दखल घ्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे.


गॅस सिलेंडर माफिया सक्रिय झाले असून त्यांच्या विरोधात गंभीर कारवाई करण्यात यावी जेणेकरून भविष्यात मोठा अपघात होणार नाही ह्याची दक्षता घेण्यात यावी हयापुवी सुद्धा पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त ह्यांना आपले सरकार पोटल वर पिंपरी चिंचवड शहरातील हातगाडी धारक रस्त्यावर गॅस सिलेंडर वापर करून व्यवसाय करत असून त्या संदर्भात कारवाई करण्यात यावी म्हणून मागणी करण्यात आली होती त्या संदर्भात पिंपरी चिंचवड शहर पोलिस आयुक्त व अधिकारी व कर्मचारी ह्यांनी केराची टोपली दाखवली असून शहरात मध्यवर्ती ठिकाणी चोरीचा गॅस सिलेंडर भरण्याचा प्रयत्न करण्यात येत असून त्यामुळे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन उच्च स्तरीय चौकशी समिती नेमण्यात यावी तसेच गॅस सिलेंडर माफिया ह्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *