महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ जुन ।। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार शुक्रवारी (दि.२८) राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात अंतरिम अर्थसंकल्प (Maharashtra Interim Budget 2024) सादर केला. त्यांनी अंतरिम अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे.
माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा
अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. यासाठी दरवर्षी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल. जुलै २०२४ पासून सुरु होणाऱ्या या योजनेत महिलांना प्रति महिना १५०० रुपये मिळणार असल्याचे ते म्हणाले.
♦️मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा.
♦️दरवर्षी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद.
♦️जुलै २०२४ पासून सुरु होणाऱ्या या योजनेत महिलांना प्रतिमाह १५०० रुपये मिळणार. @AjitPawarSpeaks#MonsoonSession2024 #Budget #MaharashtraBudget pic.twitter.com/LOzGgYsdf6
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) June 28, 2024
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
विविध शैक्षणिक संस्थांमधून दरवर्षी १० लाख युवक युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची घोषणाही राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. या अंतर्गत प्रति प्रशिक्षणार्थीला दरमहा १० हजार रुपये विद्या वेतन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.