Maharashtra Politics : फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’ व्हिडीओवर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ ऑक्टोबर । राज्यामध्ये मराठा आंदोलनामुळे निर्माण झालेली अस्थिरता, विधानसभा अध्यक्षांसमोर शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत सुरू असलेली सुनावणी या पार्श्वभूमीवर प्रदेश भाजपकडून ‘एक्स’ (पूर्वाश्रमीच्या ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन,’ अशा आशयाचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्यानंतर चर्चेला उधाण आले होते. मात्र काही वेळात भाजपनेही सावध भूमिका घेत हा व्हिडिओ डिलिट केला. या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

एका टीव्ही वृत्तवाहिनीशी बोलताना शिंदे म्हणाले , मी भाजपने ट्वीट केलेला व्हिडीओ पाहिला नाही, व्हिडीओ बघावा लागेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. नवमहाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईन…. अशा अशायचा ३१ सेकंदाचा एक व्हिडीओ भाजपच्या अधिकृत अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडीओनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचा पाहायला मिळाले. तसेच उलटसुटलट चर्चा देखील सुरू झाल्या. नेटकऱ्यांकडून या व्हिडीओबद्दल प्रश्न विचारण्यात येऊ लागल्यानंतर हा व्हिडीओ डिलीट करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *