xAI : इलॉन मस्कची मोठी घोषणा! उद्या लॉन्च होणार कंपनीचं पहिलं ‘AI’

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ नोव्हेंबर ।। आर्टिफिशिअल इटेलिजन्स अर्थात AI मुळं अवघ्या जगात मोठी तंत्रज्ञानावर आधारित क्रांती होण्याच्या मार्गावर आहे. सर्वत्र सध्या याच तंत्रज्ञानाची चर्चा आहे. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि अॅप देखील आपलं स्वतंत्र एआय प्रोग्राम लॉन्च करत आहेत.

त्यातच आता सोशल मीडियातील बडी कंपनी असलेल्या एक्सचा (ट्विटर) मालक इलॉन मस्कनं पहिल्या आर्टिफिशिअल इटेलिजन्स कंपनीच्या पहिल्या एआय प्रोग्रामची घोषणा केली आहे. उद्या हे एआय लॉन्च होणार आहे.

https://x.com/elonmusk/status/1720372289378590892?s=20

AI बाबत मस्कचा मोठा दावा
इलॉन मस्कनं एक्सवर पोस्ट करुन याची माहिती दिली आहे. यामध्ये त्यानं म्हटलं की, उद्या विशिष्ट गटासाठी एक्सएआय लॉन्च होईल. सध्याच्या अस्तित्वात असलेल्या एआय प्रोग्रामपैकी हे सर्वोत्तम एआय असेल असा दावाही मस्कनं आपल्या पोस्टमधून केला आहे. (Latest Marathi News)

उद्या होणार लॉन्च
बिलेनिअर इलॉन मस्क यांची xAI ही आर्टिफिशिअल कंपनी उद्या आपलं पहिलं AI प्रोग्राम लॉन्च करणार आहे. पण हा प्रोग्राम मर्यादित क्षमतेत लॉन्च होणार आहे. याच वर्षी जुलै महिन्यात मस्कनं आपलं एआय स्टार्टअप सुरु केलं होतं. याला त्यानं मानवतेसाठी काम करणारं स्टार्टअप असं म्हटलं होतं. या स्टार्टअप अर्थात कंपनीला मस्कनं xAI असं नावही दिलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *