अश्विनच्या जागी भारतीय संघात आलेला तनुष कोटियन आहे तरी कोण, जाणून घ्या सर्व माहिती..

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२३ डिसेंबर ।। रवीचंद्रन अश्विनचा उत्तराधिकारी कोण, हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. पण हा प्रश्न आता भारतीय संघाने सोडवला आहे. कारण आता अश्विनच्या जागी मुंबईच्या तनुष कोटियानला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर पाठवण्यात येणार आहे. पण तनुष कोटियन आहे तरी कोण, याची माहिती आता समोर आली आहे.


तनुष कोटियन आहे तरी कोण….
तनुष हा मुंबईच्या संघाकडून खेळणारा युवा अष्टपैलू खेळाडू आहे. गेल्या काही वर्षांपासून तनुष हा प्रकाशझोतात आला आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये तर तमुषने चांगली कामगिरी केली आहेच, पण यापूर्वी भारताचा ‘ अ ‘ संघ जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता, तेव्हा तनुषचा भारताच्या संघात समावेश होता. तनुषने या दौऱ्यात चांगली कामगिरी केली होती. तनुषच्या नावाची चांगलीच चर्चा झाली होती. तनुष हा चांगला फिरकी गोलंदाज आहे. आपल्या फिरकीच्या जाळ्यात त्याने भल्या भल्या फलंदाजांना अडकवलं आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तनुष हा उत्तम फलंदाजीही करतो. आतापर्यंत तनुषने संघासाठी उपयुक्त फलंदाजीही केली आहे. त्यामुळे अश्विनच्या जागी तनुष हा चपखल बसणार खेळाडू असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु झाली आहे.

तनुषने स्थानिक स्पर्धांमध्ये कशी कामगिरी केली आहे….
तनुषने मुंबईकडून खेळताना रणजी करंडक स्पर्धेत चांगली चमक दाखवली. पण तनुष फक्त त्यावर थांबला नाही त्यानंतर मुंबईकडून तो एकामागून एक स्पर्धा खेळत गेला, ज्यामध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी यांचा समावेश होते. तनुष गोलंदाजीत उत्तम कामगिरी करतच होता. पण एक उपयुक्त फलंदाज म्हणूनही त्याने त्याची ओळक निर्माण केली आहे. त्यामुळे फार कमी वेळात तनुष हा मुंबईचा महत्वाचा खेळाडू ठरला. आता तर तनुषची थेट भारतीय संघात निवड झाली आहे.
Ravichandran Ashwin

अश्विनच्या निवृत्तीनंतर वॉशिंग्टन सुंदरलाच संधी मिळेल, असे वाटत होते. आता अश्विनचा उत्तराधिकारी म्हणून तनुषची भारतीय संघासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियात तनुषला संधी मिळणार की वॉशिंग्टनला याची उत्सुकता चाहत्यांना लागलेली असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *