महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२३ डिसेंबर ।। मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. थंडी वाढल्याने अंड्यांच्या भावात देखील तेजी आली आहे. यामुळे अंड्यांचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. साधारणपणे एका ट्रे (३० अंडी) मागे वीस रुपयांनी वाढ झाली आहे. अर्थात डझनभर अंडी घेण्यासाठी आता ८० ते १०५ रुपये मोजावे लागणार आहेत.
मागील काही दिवसांपासून राज्यात थंडीचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी तापमान ५ अंशापेक्षा खाली गेले आहे. दरम्यान तापमानात घसरण होताच दरवर्षीप्रमाणे अंड्यांचे दर वाढले आहेत. साधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या थंडीच्या हंगामात ख्रिसमस व नववर्षाचा सण आणि सेलिब्रेशनचे प्रणाम अधिक असते. यामुळे अंड्यांची मागणी देखील वाढत असते.
होलसेल दरात २० रुपयांची वाढ
थंडीत अंड्यांची मागणी वाढत असते. त्यानुसार आता देखील अंड्यांची मागणी वाढल्याने दरात तेजी आली आहे. होलसेल दरात मिळणाऱ्या अंड्याच्या पाटीला २०० रुपयांचा भाव झाला आहे. मागील काही दिवसांपूर्वी १८० रुपये दराने मिळणारी अंड्याची पाटी आता २०० रुपयांना मिळत आहे. यामुळे किरकोळ भावात देखील वाढ झाली असून किरकोळ दरात ५ रुपयांना मिळणारे अंडे आता ७ ते ८ रुपयांना मिळत आहे.