व्हॉट्सॲपचे नवीन फिचर! स्टेटस अपडेटमध्ये होणार ‘हा’ बदल; काय आहे खास जाणून घ्या…

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि . २० नोव्हेंबर ।। परीक्षेचा निकाल, वाढदिवस, मॅच जिंकल्यावर तसेच एखादी आनंदाची बातमी असेल तर आपल्यातील बरेच जण व्हॉट्सॲप, इन्स्टाग्रामवर लगेचच स्टेटस ठेवतात आणि या खास गोष्टी सगळ्यांपर्यंत पोहचवतात. तसेच सोशल मीडियाचे हे ॲपसुद्धा युजर्ससाठी नवनवीन अपडेट आणि फिचर घेऊन येत असतात. तर आता व्हॉट्सॲप युजर्ससाठी ‘स्टेटस’ (status) अपडेट घेऊन येत आहे. या अपडेटमध्ये तुम्ही इतरांनी पोस्ट केलेले स्टेटस बघण्यासाठी ‘फिल्टर’ फिचरचा उपयोग करू शकणार आहात. फिल्टर फिचरचा उपयोग करून तुम्ही तुमच्या आवडीचे स्टेटस सगळ्यात पहिल्यांदा बघू शकता. यात तुम्हाला चार पर्याय दिले जातील, त्यातील एका पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक उभी (व्हर्टिकल) यादी दिसेल; यात तुम्ही तुमच्या आवडीच्या व्हॉट्सॲप सदस्यांचे स्टेटस बघू शकणार आहात.

व्हॉट्सॲप स्टेटस या पर्यायासाठी चार फिल्टर सादर करते: १. ऑल (All) , २. रिसेन्ट (Recent) , ३. व्यूव्ह (Viewed) आणि ४. म्यूट (Muted). सगळ्यात पहिला ऑल (All) फिल्टर काय असेल ते जाणून घेऊया : ऑल (All) फिल्टरमध्ये तुमच्या मोबाइलमध्ये असणाऱ्या सर्व व्हॉट्सॲप वापरकर्त्यांचे स्टेटस तुम्हाला एका यादीत दिसतील, तर रिसेन्ट (Recent) फिल्टरमध्ये तुम्हला व्हॉट्सॲप वापरकर्त्यांचे काही लेटेस्ट स्टेटस म्हणजेच काही वेळापूर्वी पोस्ट केलेले स्टेटस यादीत हायलाइट करेल. त्यानंतर व्यूव्ह (Viewed) फिल्टर तुम्ही कोणते स्टेटस बघितले आहेत याची यादी दर्शवेल. तसेच सगळ्यात शेवटचा फिल्टर म्हणजे म्यूट. (Muted) यात तुम्ही म्यूट केलेल्या सदस्यांच्या स्टेटसची यादी पाहू शकता.

व्हॉट्सॲपचा स्टेटस फिचर काही दिवसांपूर्वी अपडेट करण्यात आला होता. यात तुम्हाला स्टेटस पाहून झाल्यावर एका चिन्हावर (Arrow) क्लिक करावे लागायचे, तेव्हा तुम्हाला याची यादी दिसायची. त्यामुळे अनेक व्हॉट्सॲप वापरकर्त्यांनी पूर्वीसारखे स्टेटस पाहण्याचे फिचर परत आणण्याची विनंती केली. म्हणूनच व्हॉट्सॲप लवकरच युजर्ससाठी ‘स्टेटस फिल्टर’ हा पर्याय घेऊन येत आहे. या नवीन फिल्टरच्या मदतीने व्हॉट्सॲप युजर्स अगदी सहज पूर्वीप्रमाणे स्टेटस पाहू शकणार आहेत. काही बेटा युजर्ससाठी हा पर्याय उपलबध करण्यात आलेला आहे ; ज्यांनी प्ले स्टोरमध्ये जाऊन व्हॉट्सॲपचा बेटा फॉर अँड्रॉइड डाउनलोड केला आहे. तसेच येत्या आठवड्यात व्हॉट्सॲपच्या सर्व वापरकर्त्यांसाठी हा खास फिचर उपलब्ध करण्याची व्हॉट्सॲपची योजना आहे, असे सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *