Airtel Recharge : एअरटेल ग्राहकांसाठी खुशखबर! स्वस्तात मस्त रिचार्ज प्लान, अनलिमिटेड कॉलिंगसोबत मिळणार 2GB इंटरनेट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ ऑगस्ट ।। सध्या मोबाईल रिचार्ज महाग झाल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील आघाडीच्या कंपन्या एअरटेल आणि जिओने आपल्या मोबाईल रिचार्जच्या किंमती जुलै महिन्यात वाढवण्यात आल्या आहेत. याचा सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसला आहे. रिचार्जच्या वाढत्या किंमती ग्राहकांचे टेन्शन वाढवत आहेत. यामुळे अनेक जण स्वस्तात मस्त रिचार्ज प्लान शोधत आहेत. चला तर मग एअरटेलचे ग्राहकांसाठी कमी पैशाचा रिचार्ज प्लान जाणून घेऊयात.

एअरटेलच्या पोर्टफोलिओवर कंपनीने आपल्या इतर ग्राहकांसाठी कमी दरातील सर्वसामान्य जनतेला परवडणारे रिचार्ज प्लान दिले आहेत. तुम्ही या ऑफरचा नक्की लाभ करून घ्या आणि मनसोक्त गप्पा मारा.

रिचार्ज प्लानमधील प्रकार

काही रिचार्ज प्लान हे अनलिमिटेड कॉलसह येतात.

काही रिचार्ज प्लान हे भरपूर इंटरनेटसह येतात.

एअरटेल स्वस्तात मस्त रिचार्ज प्लान

एअरटेल कंपनीने 199 रुपयांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान लाँच केला आहे.

हा रिचार्ज प्लान २८ दिवसांसाठी मर्यादित आहे. जो सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल.

२८ दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्ही अनलिमिटेड कॉलिंग करू शकता. या प्लानमध्ये ही सुविधा दिली आहे. दिवसातून कितीही कॉल केले तरी जास्तीचे पैसे जाणार नाही.

एअरटेलच्या या प्लान मध्ये वापरकर्त्यांना १०० एसएमएसची सुविधा सुद्धा मिळतेय.

२८ दिवसांच्या कालावधीमध्ये 2 GB इंटरनेट डेटा ग्राहक वापरू शकतो.

एअरटेलच्या रिचार्ज प्लानवर ग्राहकांना फ्री हॅलो ट्यून्स मिळतात.
ज्या लोकांसाठी इंटरनेट डेटापेक्षा कॉलिंग महत्त्वाचे आहे. अशा ग्राहकांसाठी हा बेस्ट प्लान आहे. तसेच ज्या लोकांच्या घरात वायफाय सेवा उपलब्ध आहे. अशा वापरकर्त्यांनी सुद्धा या एअरटेलच्या स्वस्तात मस्त रिचार्ज प्लानमध्ये गुंतवणूक करू शकता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *