Government Job 2023 : दहावी पास उमेदवारांसाठी पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ डिसेंबर।। Government Job 2023 : तुम्ही जर १० वी उत्तीर्ण असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर, ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण, भारतीय टपाल विभागात (India Post) अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

भारतीय टपाल विभागात १० वी पास उत्तीर्ण उमेदवारांसाठी तब्बल १८९९ पदांवर ही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. जर तुम्ही या नोकरीसाठी उत्सुक असाल तर इंडिया पोस्टची अधिकृत वेबसाईट dopsportsrecruitment.cept.gov.in वर ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरावा लागेल.

या पदांसाठी १० वी पास ते पदवी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. विशेष बाब म्हणजे या जागांसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार आहे. केवळ गुणवत्तेच्या आधारे ही भरती प्रक्रिया केली जाणार आहे.

या पदांवर होणार भरती
इंडिया पोस्टच्या या भरती प्रकियेद्वारे एकूण १८९९ पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या जागा इंडिया पोस्ट मिनिस्ट्री ऑफ कम्यूनिकेशंन्सद्वारे निघाल्या आहेत.

या १८९९ पदांपैकी ५९८ पदे ही पोस्ट असिस्टंटसाठी, ५८५ पदे पोस्टमनसाठी, ५७० पदे MTS, 143 पदे शॉर्टिंग असिस्टंटसाठी आणि ३ पदे ही मेल गार्डसाठी आहेत. ही सर्व पदे स्पोर्ट्स कोटा अंतर्गत निघाली असून डिपार्टमेंट ऑफ पोस्ट्स (DOP) भारत सरकार या पदांवर भरती करणार आहे.

निवड कशी केली जाणार ?
सुरूवातीला नमूद केल्याप्रमाणे या जागांसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. केवळ गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराला १०० रूपये शुल्क भरावे लागेल.

तसेच, या भरती संदर्भातली अधिकची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. तिथे तुम्हाला अधिकची माहिती मिळू शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *