Career Tips : जाहिरात क्षेत्रात उतरायचे ? मग, ‘हे’ कोर्सेस आहेत तुमच्यासाठी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि . १६ डिसेंबर ।। Career Tips : सध्याचे युग हे जाहिरातींचे युग आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. कारण, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडियापासून ते सोशल मीडियापर्यंत आजकाल सर्वत्र फक्त जाहिरातींचा बोलबाला पहायला मिळतो. त्यामुळे, या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत.

तुमचा ब्रॅंड लहान असो किंवा मोठा आजकाल प्रत्येक कंपनीला त्यांचे प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी जाहिरातींची मदत घ्यावी लागते. यासाठी वाट्टेल तितका पैसा खर्च करण्याची त्यांची तयारी असते.

त्यामुळे, या क्षेत्रात करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. जर तुम्हाला क्रिएटिव्ह कामाची आवड असेल तर हे क्षेत्र खास तुमच्यासाठी आहे. करिअरच्या दृष्टिकोनातून जाहिरात क्षेत्रातील कोर्सेस तुमच्यासाठी एक बेस्ट करिअर ऑप्शन ठरू शकतात. चला तर मग आज आपण जाहिरात क्षेत्रातील कोर्सेसबद्दल जाणून घेणार आहोत.

जाहिरात क्षेत्रातील कोर्सेस कोणते ?
जाहिरात क्षेत्रात आजकाल अनेक प्रकारचे छोटे-मोठे कोर्सेस उपलब्ध आहेत. विद्यार्थी हे कोर्सेस त्यांच्या गरजेनुसार करू शकतात. जर तुम्हाला यातील छोटे कोर्स करायचे असतील तर तुम्ही डिप्लोमा इन अ‍ॅडव्हर्टायझिंगचा कोर्स ही करू शकता.

यासोबतच तुम्ही बॅचलर इन अ‍ॅडव्हर्टायझिंग, डिप्लोमा इन अ‍ॅडव्हर्टायझिंग अ‍ॅण्ड पब्लिक रिलेशन, डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन, बीएस्सी इन मास कम्युनिकेशन, अ‍ॅडव्हर्टायझिंग अ‍ॅण्ड जर्नालिझम, बॅचलर इन जर्नालिझम अ‍ॅण्ड मास कम्युनिकेशन, मास्टर इन मास कम्युनिकेशन अ‍ॅण्ड जर्नालिझम, पीजी डिप्लोमा इन अ‍ॅडव्हर्टायझिंग अ‍ॅण्ड पब्लिक रिलेशन, पीजी डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन इत्यादी प्रकारचे कोर्सेस या जाहिरात क्षेत्रात उपलब्ध आहेत. जे तुम्ही नक्कीच करू शकता.

कोर्सससाठी पात्रता आणि कौशल्ये
या क्षेत्रात येण्यासाठी तुम्हाला या क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रम शिकणे आवश्यक आहे. यासाठी, तुम्ही कोणत्याही शाखेतून १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. १२ उत्तीर्ण असलेले विद्यार्थी जाहिरात क्षेत्रातील डिप्लोमा आणि पदवीला प्रवेश घेऊ शकतात.

मात्र, जर तुम्हाला जाहिरात क्षेत्रात पोस्ट ग्रॅज्यूएशन करायचे असेल तर, तुम्ही कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे. जर जाहिरात क्षेत्रात तुम्हाला बॅचलरची पदवी घ्यायची असेल तर ती ३ वर्षांसाठी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *