भगवे वादळ राजधानीच्या वेशीवर; पुण्यात १० तास जरांगे-पाटलांची पदयात्रा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. 25 जानेवारी ।। मराठा आरक्षणासाठी मुंबईला निघालेली मनोज जरांगे-पाटील यांची पदयात्रा बुधवारी शहरात १० तास सुरू होती. नागरिकांकडून होणारे स्वागत, बघ्यांची गर्दी यामुळे पदयात्रा निघालेल्या रस्त्याला पालखी यात्रेचेच स्वरूप आले होते. प्रचंड गर्दीमुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. मात्र, रस्त्याची एक बाजू मोकळी ठेवून आंदोलक व त्यांची वाहने जात असल्यामुळे शिस्तीचेही दर्शन पुणेकरांना घडले. वाघोलीवरून सकाळी ११ वाजता निघालेली ही यात्रा रात्री ९ नंतर शहरातून लोणावळ्याकडे रवाना झाली. नियोजित मुक्काम लोणावळा शहराजवळील वाकसई चाळ येथे आहे. सभेसाठी १३० एकरचे, तर वाहनतळासाठी १५० एकरचे मैदान तयार करण्यात आले.

घराघरांतून प्रत्येकी २५ चपात्या, चटणी
लोणावळा, मावळ तालुक्यातील आंदर मावळ, पवन मावळ, नाणे मावळ, कामशेत, वडगाव, तळेगाव या भागामधून घराघरांतून प्रत्येकी २५ चपात्या व चटणी तयार केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *