अंबानींचा खेळणार मोठा डाव ? जियो खरेदी करणार Paytmचा वॉलेट बिझनेस? आली अशी अपडेट

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ फेब्रुवारी ।। जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस (Jio Financial Services) आणि एचडीएफसी बँक (HDFC Bank) पेटीएमचा वॉलेट व्यवसाय खरेदी करणार आहेत का? यावर एक मोठी अपडेट आली आहे. प्रमुख वित्तीय सेवा कंपनी पेटीएमनं सोमवारी यावर प्रतिक्रिया दिली.

पेटीएमनं अशा सर्व बातम्या फेटाळून लावल्या. पेटीएम आपला वॉलेट व्यवसाय विकण्यासाठी काही इच्छुक गुंतवणूकदारांशी चर्चा करत असल्याचं वृत्त काही ठिकाणी प्रसिद्ध झालं होतं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकेवर घातलेल्या बंदी दरम्यान या बातम्या आल्या होत्या. पेटीएमच्या वॉलेट व्यवसायासाठी बोली लावण्यात एचडीएफसी बँक आणि जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आघाडीवर असल्याचा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता.

‘आम्ही बाजारातील कोणत्याही तर्कवितर्कांवर भाष्य करत नाही. आम्ही नियामकाच्या सूचनांचं पूर्णपणे पालन करतो. पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडद्वारे (पीपीबीएल) ऑफर केलेल्या उत्पादनांसह अखंड ग्राहक अनुभव सुनिश्चित करण्याचा आम्ही प्रयत्न करतो,’ असं त्यांनी पेटीएम पेमेंट्स बँकेच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.

यापूर्वी पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांनी कर्मचारी कपात केली जाणार नसल्याचं आपल्या कर्मचाऱ्यांना आश्वासन दिलं होतं. कंपनीची रिझर्व्ह बँकेशी चर्चा सुरू आहे. याशिवाय इतर बँकांसोबत भागीदारी करण्याच्या पर्यायांचाही विचार करत आहे.

‘आम्ही लवकरच मार्ग शोधून काढू. काय करता येईल हे पाहण्यासाठी आम्ही रिझर्व्ह बँकेशीही संपर्क साधू शकतो,’ असं वर्च्युअल टाऊन हॉलमध्ये कर्मचाऱ्यांना संबोधित करताना शर्मा म्हणाले होते.

डिझाइन आणि संरचना या दोन्ही बाबतीत, फिनटेक कंपनी आणि तिचे भागीदार एकसारखे नाहीत आणि असू शकत नाहीत, असं यावर स्पष्टीकरण देताना, पेटीएमचे अध्यक्ष आणि ग्रुप सीएफओ मधुर देवरा यांनी म्हटलं आहे.

पेटीएम आणि पेटीएम पेमेंट्स बँक एकच आहेत असा एक समज असू शकतो, परंतु डिझाइन आणि संरचनेनुसार असं नाही आणि असूही शकत नाही. पहिली म्हणजे ती एक सहयोगी कंपनी आहे आणि दुसरे म्हणजे ती बँक आहे या अर्थानं ती सहयोगी कंपनी नाही, असं मधुर देवरा यांनी म्हटलं.

एका बँकेसाठी सर्वप्रथम आणि महत्त्वाची बाब ही आहे की त्यांनी त्या नियमांचं पालन केलं पाहिजे, ज्याचं पालन एका बँकेला करणं आवश्यक आहे. ज्याची स्वतंत्र व्यवस्थापन टीम असली पाहिजे. एका बँकेकडे स्वतंत्र अनुपाल आणि जोखीम टीमही असली पाहिजे, असं त्यांनी नमूद केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *