9 वी ते 12 पर्यंतच्या शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा बंधनकारक

Spread the love

महाराष्ट्र 24 : ऑनलाईन – दि. 14 :-TET Exam : 9 वी ते 12 पर्यंतच्या शिक्षकांसाठी टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य होण्याची शक्यता आहे. केंद्रानं तसा प्रस्ताव ठेवला आहे. आतापर्यंत पहिली ते आठवीपर्यंतच्या शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्य होती हा प्रस्ताव मान्य झाला तर 2020 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत 9 वी ते 12 पर्यंतच्या शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे. 

यामुळे आता शिक्षकांना  टीईटी परीक्षा द्यावाच लागणार आहेत. विशेष म्हणजे एखादा शिक्षक एकदा टीईटी उत्तीर्ण झाल्यास ती मान्यता आयुष्यभर वैध करण्याची योजना आहे. याचाच अर्थ एखादा उमेदवार एकदा टीईटी उत्तीर्ण झाला तर तो आयुष्यभर वैध राहिल.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत, शालेय शिक्षण संरचना चार टप्प्यांमध्ये विभागण्यात आली आहे. मूलभूत, पूर्वतयारी, मध्यम आणि माध्यमिक या अंतर्गत शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने शिक्षक पात्रता चाचणीचा विस्तार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी टीईटी परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे.

हरियाणा, केरळ, ओडिशा आणि इतर तीन राज्यांनी TET नियम बदलण्यात आले आहेत. या राज्यांमध्ये STET म्हणजेच राज्य शिक्षक पात्रता परीक्षा इयत्ता 12 वी पर्यंत लागू करण्यात आली आहे. TET चा नियम सर्व राज्यांमध्ये 12वी पर्यंतचे वर्ग घेणाऱ्या शिक्षकांसाठी लागू होणार आहे.

सेमी इंग्लिश शाळांमधल्या शिक्षकांसाठी धोक्याची घंटा 

सेमी इंग्लिश शाळांमधल्या शिक्षकांसाठी एक धोक्याची घंटा आहे. सेमी इंग्लिश शाळांमधील जे शिक्षक 2022 मधील शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणा-यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. याशिवाय या शिक्षकांची इंग्रजी भाषेशी संबंधित संस्थेकडून कौशल्य चाचणी घेण्यात येणार असून त्यात या शिक्षकांची कामगिरी असमाधानकारक राहिल्यास त्यांची सेवा समाप्त केली जाणारंय. याबाबतचे आदेश राज्याचे शिक्षण सूरज मांढरे यांनी दिले आहेत. पवित्र पोर्टरवर सेमी इंग्लिश शाळांकरता नोंदवण्यात आलेल्या मागणीला अनुसरून 2022 मध्ये सरकारमार्फत एक परीक्षा घेण्यात आली होती. त्यातील उत्तीर्ण शिक्षकांची आणखी एक कौशल्य चाचणी घेतली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *