लवकरच मोठा चेहरा अजित पवारांकडे येणार, सुप्रिया सुळेंचेही स्वागत ; प्रफुल पटेल

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ मार्च ।। लवकरच एक मोठा चेहरा अजित पवारांच्यासोबत (Ajit Pawar) येणार आहे. त्या व्यक्तीसोबत राज्यसभा निवडणुकीच्या आधी चर्चा सुरू होती असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) (NCP Ajit Pawar) नेते प्रफुल पटेल ( Praful Patel) यांनी केला. आमच्या पक्षात सुप्रिया सुळेंचेही स्वागत आहे. त्यांना आम्ही अद्यापही नकार दिला नाही. त्यांच्यावर आम्ही टीका देखील नसल्याचेही प्रफुल पटेल यांनी सांगितले.

एबीपी माझाच्या माझा व्हिजनमध्ये प्रफुल पटेल यांनी राजकीय मुद्यांवर भाष्य करताना आगामी काळातील काही सूचक वक्तव्येही केली. यावेळी प्रफुल पटेल यांनी 2014 आणि 2019 मध्ये भाजपसोबत राष्ट्रवादीने जाण्याच्या निर्णयावर गौप्यस्फोट केले.

राज्यसभा निवडणुकीत प्रफुल पटेल यांना राज्यसभेची खासदारकी असताना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. त्याबाबत प्रश्न विचारला असताना प्रफुल पटेल यांनी गौप्यस्फोट केला. त्यांनी म्हटले की, एका मोठ्या व्यक्तीसोबत आमची चर्चा सुरू होती. काही बैठकाही झाल्या. पण, अखेर त्यांच्याबाबत निर्णय पुढे ढकलण्यात आला असल्याचे प्रफुल पटेल यांनी सांगितले. लवकरच हा मोठा चेहरा अजित पवारांकडे येणार आहे. काही दिवस नाव गुलदस्त्यात राहणार असल्याचे पटेल यांनी सांगितले. सुप्रिया सुळे आमच्यासोबत आल्या तर त्यांचे स्वागत आहे. त्यांना आमचा नकार नाही. त्यांच्यावर आम्ही टीका देखील नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

तो निर्णय फक्त आमच्या तिघांमध्येच…

प्रफुल पटेल यांनी म्हटले की, 2014 विधानसभा निवडणूक निकालानंतर आम्ही भाजपला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा देण्याची घोषणा केली. त्यानंतर भाजपजवळ गेलो. त्यानंतर राजकीयदृष्ट्या जवळ-लांब जात राहिलो. शरद पवारांबद्दल वैयक्तिक टीका नाही, रोष नाही. मात्र, आमची राजकीय भूमिका वेगळी आहे.शरद पवारांसोबत राजकीय भूमिका घेण्याबाबत मतभेद झाले. 2019 मध्ये भाजपसोबत चर्चा झाली होती, असा दावा पटेल यांनी केला.

राष्ट्रपती राजवट अशीच लागत नसते. त्यावेळी मोठ्या पक्षांसह इतरांनीदेखील सत्ता स्थापन करण्यास नकार दिला. एक महिन्याच्या राष्ट्रपती शासनकाळाची कोंडी फोडण्यासाठी  शपथविधी झाला असल्याचे त्यांनी म्हटले. 2019 मधील भाजपसोबतच्या शपथविधी बाबतच्या निर्णयाबाबत अजित पवार, शरद पवार आणि मी अशा आम्हा तीन लोकांमध्ये चर्चा झाली होती. त्यावेळी इतरांना कल्पना नव्हती. आमच्याच ही बाब ठेवली असल्याचा गौप्यस्फोटही पटेल यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *