credit cards | क्रेडिट कार्ड वापरताय! नियमांत बदल; RBI ने दिले ‘हे’ महत्त्वाचे निर्देश, वाचा सविस्तर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ मार्च । क्रेडिट कार्ड (credit cards) जारी करणे आणि त्याच्या वापराबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. कार्ड जारी करणारे कार्ड नेटवर्कशी कोणतीही व्यवस्था अथवा करार करू शकत नाहीत. ज्यामुळे त्यांना इतर कार्ड नेटवर्कच्या सेवांचा लाभ घेण्यापासून रोखले जाईल. कार्ड जारीकर्ते त्यांच्या पात्र ग्राहकांना कार्ड जारी करताना एकाहून अधिक कार्ड नेटवर्क निवडीचा पर्याय देतील. तर विद्यमान कार्डधारकांना पुढील नूतनीकरणाच्या वेळी हा पर्याय त्यांना दिला जाऊ शकतो, असे आरबीआयने म्हटले आहे.

RBI ने परिपत्रकात म्हटले आहे की, “क्रेडिट कार्ड संबंधित व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर असे आढळून आले आहे की कार्ड नेटवर्क आणि कार्ड जारीकर्त्यांमधील काही व्यवस्था ग्राहकांच्या पसंतीच्या उपलब्धतेसाठी अनुकूल नाहीत.” ग्राहकांना क्रेडिट कार्ड जारी करणे आणि वापरण्यात अधिक पर्याय आणि लवचिकता सुनिश्चित करणे, हा आरबीआयचा मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यामागचा उद्देश आहे. कार्ड नेटवर्क आणि कार्ड जारीकर्त्यांची काही व्यवस्था ग्राहकांसाठी मर्यादित पर्याय देत आहे, असेही आरबीआयने म्हटले आहे.

RBI चे निर्देश
कार्ड जारी करणाऱ्यांना इतर कार्ड नेटवर्कवरून सेवा प्राप्त करण्यापासून रोखणारे करार करण्यास मनाई आहे.
कार्ड जारी करणाऱ्यांनी पात्र ग्राहकांना कार्ड जारी करताना एकाहून अधिक कार्ड नेटवर्क निवडीचा पर्याय द्यायला हवा.
विद्यमान कार्डधारकांच्या बाबतीत, हा पर्याय त्यांच्या पुढील कार्ड नूतनीकरणाच्या वेळी दिला जावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *